Published On : Wed, Apr 5th, 2017

‘दिलखुलास’मध्ये कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर यांची मुलाखत

Mumbai: मुंबई, दि.5 : राज्यात कृषी विभागामार्फत ‘उन्नत शेती-समृध्द शेतकरी पंधरवडा’ साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर यांची विशेष मुलाखत ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात घेण्यात आली आहे.

ही विशेष मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून दिनांक 6 आणि 7 एप्रिल 2017 रोजी अनुक्रमे गुरूवार आणि शुक्रवार या दिवशी सकाळी 7.25 ते 7.40 वाजता या वेळेत प्रसारित होईल. ही मुलाखत शिबानी जोशी यांनी घेतली आहे. या मुलाखतीत राज्यात कृषी विभाग ‘उन्नत शेती-समृध्द शेतकरी पंधरवडा’ आणि या वर्षात घेतल्या जाणा-या पीकांच्या उत्पादन खर्चापेक्षा अधिक उत्पन्न राज्यातील शेतक-यांना खात्रीशीरपणे मिळावे, याबद्दल राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांविषयी सविस्तर माहिती श्री. फुंडकर यांनी दिली आहे.