| | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Feb 5th, 2018

  ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची मुलाखत

  मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. महिला उद्योग धोरण या विषयावर ही मुलाखत उद्या मंगळवार दि. 6 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7.30 ते 8.00 या वेळेत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित होणार आहे. निवेदिका पल्लवी मुजुमदार यांनी ही मुलाखत घेतली आहे.

  महिला उद्योग धोरणाचे उद्दिष्ट, महिला उद्योजकांना देण्यात येणारे भांडवली अनुदान, कामगार कल्याण सहाय्य योजना, सूक्ष्म व लघु उद्योगातील महिला उद्योगांचे विपणन होण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न, क्लस्टरसाठी देण्यात येणारे अनुदान, साहस भांडवल योजना, महिला उद्योजकांना कौशल्य विकासासाठी करण्यात येणारे प्रयत्न याविषयी तसेच या कार्यक्रमात सहभागी झालेल्या राज्यातील महिला उद्योजकांनी महिला उद्योग धोरण या विषयाच्या अनुषंगाने प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांची सविस्तर उत्तरे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात दिलेली आहेत.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145