Published On : Tue, Apr 4th, 2017

‘दिलखुलास’ मध्ये गायिका गीता माळी यांची मुलाखत

मुंबई: ‘गायन माझी साधना’ या विषयावर माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात नाशिक येथील गायिका गीता माळी यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे.

ही विशेष मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून दिनांक 4 आणि 5 एप्रिल 2017 रोजी मंगळवार आणि बुधवार या दिवशी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. ही मुलाखत हेमंत बर्वे यांनी घेतली आहे.या मुलाखतीत गायन क्षेत्रातील प्रवास,आतापर्यंत केलेले विविध कार्यक्रम, अनुभव आणि या क्षेत्रातील करिअर आदींबाबत श्रीमती माळी यांनी माहिती दिली आहे.