Published On : Thu, Jul 9th, 2026
By Nagpur Today Nagpur News

आंतरधर्मीय विवाहाचा राग; नागपुरात तरुणावर दगडाने हल्ला, चौघांविरुद्ध गुन्हा

Advertisement

नागपूर : आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून एका २५ वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना लकडगंज परिसरात घडली. पत्नीला घटस्फोट देऊन तिची आपल्या ताब्यात सोपवण्याचा दबाव टाकल्यानंतर नकार मिळाल्याने आरोपींनी तरुणाला मारहाण करत दगडाने डोक्यात वार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशपेठ येथील कर्नल बाग परिसरात राहणारा तुषार कैलास बिरहा (२५) याने ५ जून २०२६ रोजी माहेक हिच्याशी प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर माहेक तुषारसोबत राहत असून ती सध्या तीन महिन्यांची गर्भवती आहे.

या विवाहाला महिलेच्या नातेवाईकांचा विरोध होता. ८ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास तुषारला गंगाबाई घाट चौकात बोलावण्यात आले. तेथे आरोपींनी पत्नीला घटस्फोट देऊन तिला परत पाठवण्याची मागणी केली. तुषारने नकार दिल्यानंतर त्याला शिवीगाळ करण्यात आली, धमक्या देण्यात आल्या तसेच त्याचा मोबाईल फोनही फोडण्यात आल्याचा आरोप आहे.

यानंतर वाद विकोपाला गेल्याने एका आरोपीने रस्त्यावरील दगड उचलून तुषारच्या डोक्यावर मारला. इतर आरोपींनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने तो जखमी झाला. उपचारासाठी त्याला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Advertisement

तुषारच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी जाहीद अली, नुमेर अली, मोहम्मद मतीन मोहम्मद हफीज आणि शाहीद अली हाजी रजब अली यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविला असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.