Published On : Thu, Jul 9th, 2026
By Nagpur Today Nagpur News

वि केअर चॅरिटेबल ट्रस्ट ” द्वारे सोनेगाव आमराई आंब्याचे झाड लावले

Advertisement

नागपूर : सोनेगाव आमराई हे ठिकाण ( जुना सोनेगाव विमानतळ चा रोड) साधारण 300 वर्षा जुना भोसलेंकालिन् परिसर..पूर्वी आंब्याची वृक्ष होती या “आमराईत”. काळाच्या ओघात गेली ती. हल्ली एक चार पाच आंब्याचे वृक्ष राहिली आहे. या आमराई चे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी हल्ली प्रयत्न सुरू आहे..साधारण 300 वर्ष जुने वैभव परत आणण्यात येत आहे..या आमराई मध्ये पहिले आंब्याचे वृक्ष ” वि केअर चॅरिटेबल ट्रस्ट ” द्वारे लावण्यात आले. येत्या काळात या आमराई चा कायापालट होणार असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष श्री विशाल अभ्यंकर तसेच WeLoveसोनेगाव आमराई ग्रुप चे सचिन द्रवेकर यांनी व्यक्त व्यक्त केला आहे.

या वृक्षारोपण कार्यक्रमात डॉ. हेमांगी अभ्यंकर, श्री नारायण आहुजा, श्री प्रमोद परसोडकर , नंदकुमार गुप्ता, जीवन कोढ रा, सुशील जाधव अणि संस्थेतर्फे श्री विशाल अभ्यंकर, सौ वैभवी अभ्यंकर, श्री निलेश पिंपलापुरे उपस्थित होते.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.