Published On : Wed, Jun 2nd, 2021

इंटरमॉडेल स्टेशन अजनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पाच पट झाडे लावणार ना. गडकरी

नागपूर: अजनी येथे होऊ घातलेल्या इंटरमॉडेल स्टेशन विकसित करण्यासाठी जी झाडे कमी केली जातील, त्यापेक्षा 5 पट अधिक व उभी असलेली झाडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण शंकरपूर येथील वनविभागाच्या जमिनीवर लावणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज एका ट्विटवरून दिली.

या प्रकल्पात उड्डाण पूल आणि त्याला जोडले जाणारे अ‍ॅप्रोच रोड यासाठी 408 झाडे कमी होतील. तसेच इंटरमॉडेल स्टेशन हे 44.4 एकर जमिनीवर विकसित होणार आहे. या प्रकल्पात 4522 झाडे कमी होतील. त्याबदल्यात प्राधिकरण पाचपट अधिक झाड्यांची लागवड करणार आहे.

Gold Rate
16 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,10,700 /-
Gold 22 KT ₹ 1,03,000 /-
Silver/Kg ₹ 1,29,800/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अधिक सुविधा, निवासी गाळे, दुकाने या जमिनीवर होणार आहेत. हे सर्व करताना 2023 झाडे वाचविण्यात आली आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

Advertisement
Advertisement