| | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Jun 2nd, 2021

  आप नागपुर मनपा निवडणूक प्रभारी म्हणून देवेंद्र वानखड़े तर सह प्रभारी म्हणून जगजीत सिंग यांची नियुक्ति

  – आप लढणार मनपा निवडणूक देवेन्द्र वानखेड़े प्रभारी तर जगजीत सिंघ सहप्रभारी

  नागपुर- पुढिल वर्षी, 2022, ला होणारया नागपुर महानगर पालिकेच्या निवडणूकीची आम आदमी पार्टी ने तयारी सुरु केली असून श्री देवेंद्र वानखडे यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मागच्या आठवड्यात आम आदमी पार्टी, महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी ची बैठक पार पडली. या बैठकीला राज्याचे संयोजक श्री रंगा राचुरे व इतर पदाधिकारी उपस्थीत होते. या बैठकीत नागपुर महानगर पालिका निवडणुकी साठी श्री देवेंद्र वानखडे यांची प्रभारी व श्री जगजीत सिंग यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे आम आदमी पार्टी चे राज्य सचिव श्री धनंजय शिंदे यांनी प्रसिध्दी मध्यमाला कलविले आहे.

  श्री देवेंद्र वानखेडे हे आम आदमी पार्टी च्या राष्ट्रीय परिषदेचे सदस्य असून सद्ध्या ते आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य समितीचे सदस्य आहेत. श्री वानखेडे यांच्या कडे आम आदमी पार्टी विदर्भ प्रदेश संयोजक ही प्रमुख जवाबदारी सुद्धा आहे. 2014 नागपुर लोकसभा निवडणुक आम आदमी पार्टी तर्फे श्रीमती अंजली दमानिया यांनी लढविली होती तेव्हा श्री देवेंद्र वानखडे हे आम आदमी पार्टी नागपुर जिल्हा संयोजक होते. तसेच श्री देवेंद्र वानखडे यांनी आम आदमी पार्टी च्या ‘मिशन विस्तार’ मधे भरपूर योगदान देऊन संपुर्ण विदर्भात आम आदमी पार्टी चा भक्कम पाया उभा केला आहे.

  श्री जगजीत सिंग हे आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य समीती मधे खजिनदार ही महत्वाची जवाबदारी संभाळून आहेत. श्री जगजीत सिंग यांनी पुर्वी आम आदमी पार्टी विदर्भ प्रदेश समिती चे सचिव म्हणून काम केले आहे. श्री देवेंद्र वानखडे आणि श्री जगजीत सिंग यांनी आम आदमी पार्टी ने यशस्वी पणे लढविलेल्या दिल्ली आणि गोवा विधान सभा निवडणुका मधे बुथ व्यवस्थापन, निधी व्यवस्थापन तसेच विधान सभा क्षेत्र सम्पर्क प्रमुख इत्यादी महत्वाच्या जवाबदारया यशस्वी रित्या सांभाळल्या आहेत.

  श्री देवेंद्र वानखडे व श्री जगजित सिंग यांच्या नियुक्ती चे स्वागत करुन 2022 च्या नागपुर महानगर पालिका निवडणुकीत आम आदमी पार्टी भरघोस यश संपादन करेल असा विश्वास पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145