नागपूर : स्वच्छ, सुंदर व स्वस्थ नागपूर साकारण्यासह नागरिकांना उत्तम सोयीसुविधा प्रदान करण्यासाठी नागपूर महानगरपालिका कटिबद्ध आहे. मनपाद्वारे मे. ए. जी. इन्फ्रा प्रा. लि. आणि मे. बी. व्ही. जी. इंडिया लि. या दोन एजन्सीला शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी देण्यात आली आहे. या एजन्सीद्वारा शहरातील घरोघरी जाऊन कचरा संकलन करणाऱ्या वाहनांची मनपा आयुक्त श्री. अभिजीत चौधरी यांचे निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त (शहर) श्रीमती. वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनात सोमवारी (ता.२१) तपासणी करण्यात आली.
नागपूर महानगरपालिका हद्दीत कचरा संकलन आणि वाहतूक व्यवस्थेत पारदर्शकता आणण्याकरिता आणि नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांनी मनपाच्या दहाही झोन निहाय असणाऱ्या कचरा संकलन वाहनांच्या पार्किंग स्थळांना भेट दिली. यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त श्री. राजेश भगत, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, सर्व झोनल अधिकारी, एनडीएचे झोन प्रमुख, कारखाना विभागाचे कर्मचारी व आयईसी चमूचे सदस्य यांच्यासह मे. ए. जी. इन्फ्रा प्रा. लि. आणि मे. बी. व्ही. जी. इंडिया लि. चे प्रतिनिधी उपस्थित होते.
शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या मे. ए. जी. इन्फ्रा प्रा. लि. आणि मे. बी. व्ही. जी. इंडिया लि. या दोन्ही एजन्सींच्या वाहनांची विशेष पथकाद्वारे तपासणी करण्यात आली. या दोन्ही एजन्सीद्वारे कचरा संकलनासाठी लहान आणि मोठी अशी एकूण ५३६ वाहने तैनात करण्यात आली आहेत. यात सीतानगर केंद्रावर ६४, जयताळा केंद्रावर ६९, बुधवार बाजार केंद्रावर १३, भांडेवाडी (ए.जी.) केंद्रावर १५०, भांडेवाडी (बीव्हीजी) केंद्रावर ८७, दही बाजार केंद्रावर ३५, कामगार नगर केंद्रवर ५६, आहुजानगर केंद्रावर ५७, मानकापूर घाट केंद्रावर ५ अशा ५३६ वाहनांची तपासणी करण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांनी वाहनांसंबधित अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या.
पाहणी दरम्यान सीतानगर केंद्रावर श्री. ऋषिकेश इंगळे, जयताळा केंद्रावर श्री. दीनदयाल टेंभेकर, भांडेवाडी (ए.जी.) केंद्रावर श्री. विठोबा रामटेके, भांडेवाडी (बीव्हीजी) केंद्रावर श्री. मंगेश राऊत, बुधवार बाजार केंद्रावर श्री. दिनेश कलोडे, दही बाजार केंद्रावर श्री. वामन काईलकर, आहुजा नगर केंद्रावर श्री. प्रमोद आत्राम, मानकापूर घाट केंद्रावर श्री. भुषण गजभिये इत्यादी झोनल अधिकारी उपस्थित होते.