
मुंबई : उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे कोचिंग क्लासमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील कोचिंग क्लासेसच्या सुरक्षेचा प्रश्न विधानसभेत उपस्थित करण्यात आला आहे. भाजप आमदार प्रवीण दटके यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे राज्य सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली.
२२ जून २०२६ रोजी लखनऊच्या अलीगंज परिसरातील एका व्यावसायिक इमारतीत भीषण आग लागून १५ ते २५ वयोगटातील १५ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. संबंधित कोचिंग क्लासकडे अग्निसुरक्षेची आवश्यक व्यवस्था नव्हती, तसेच फायर एनओसी आणि अन्य आवश्यक परवानग्यांचाही अभाव असल्याची बाब समोर आली आहे.
या घटनेचा संदर्भ देत दटके यांनी महाराष्ट्रात अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी राज्यभरातील कोचिंग क्लासेस चालणाऱ्या इमारतींची विशेष तपासणी मोहीम राबविण्याची मागणी केली. संबंधित इमारतींकडे बांधकाम परवानगी, अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र (फायर एनओसी) तसेच इतर आवश्यक परवानग्या आहेत की नाहीत, याची पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात यावेत, असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळ करणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या विनापरवाना कोचिंग क्लासेसवर कठोर कारवाई करून त्यांना तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्याची मागणीही त्यांनी शासनाकडे केली. विद्यार्थ्यांची सुरक्षा सर्वोच्च प्राधान्य मानून राज्य सरकारने याबाबत त्वरित निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा दटके यांनी व्यक्त केली.
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...
नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews
मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...
12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews
अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY




