Published On : Sat, Feb 16th, 2019

महापौर इनोव्हेशन कौन्सिलच्या वतीने १६ ला “बौद्धिक संपदा” विषयावर कार्यशाळा

नागपूर: ‘मेयर इनोव्हेशन अवॉर्ड’अंतर्गत महापौर इंनोव्हेशन कौन्सिलच्या वतीने शनिवार १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता सिव्हील लाईन्स येथील राजीव गांधी इंस्टिट्युट ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ॲण्ड मॅनेजमेंटच्या सभागृहात ‘बौद्धिक संपदा’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

मेयर इनोव्हेशन कौन्सिलच्या वतीने नुकतेच कविवर्य सुरेश भट सभागृहात ‘हॅकॉथॉन’चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण ७५० नवसंशोधकांनी आपल्या संकल्पना सादर केल्या. यामधील बहुतांश संकल्पना नावीन्यपूर्ण आहेत. या आणि अशा संकल्पनांना रजिस्टर करण्यासाठी, पेंटट मिळविण्यासाठी काय करावे, याकरिता ही कार्यशाळा आहे. ज्यांनी महापौर इनोव्हेशन अवॉर्डकरिता नोंदणी केली आहे विशेषत्वाने त्यांच्याकरिता सदर कार्यशाळेचे आयोजन महापौर नंदा जिचकार यांच्या नेतृत्वात करण्यात आले आहे. नवसंशोधकांनी सदर कार्यशाळेत उपस्थित राहावे, असे आवाहन महापौर इनोव्हेशन कौन्सिलचे कार्यवाहक डॉ. प्रशांत कडू यांनी केले आहे.