नवी दिल्ली: इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे सोशल मीडियावर पोस्ट करत अभिनंदन केले.
सुधा मूर्ती या इन्फोसिस फाऊंडेशनचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आहेत. सुधा मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्ती ही ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची पत्नी आहे.
पंतप्रधान मोदी आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, भारताच्या राष्ट्रपतींनी सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर नियुक्ती केल्याचा मला आनंद आहे. सामाजिक कार्य, परोपकार आणि शिक्षण यासह विविध क्षेत्रात सुधाजींचे योगदान प्रचंड आणि प्रेरणादायी आहे. त्यांची राज्यसभेतील उपस्थिती ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या ‘नारी शक्ती’चा एक शक्तिशाली पुरावा, जो आपल्या देशाचे नशीब घडवण्यात महिलांच्या सामर्थ्याचे आणि क्षमतेचे उदाहरण देतो. मी त्यांना यशस्वी संसदीय कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो.
दरम्यान सुधा मूर्ती इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा आहेत. तसेच त्या लेखिका म्हणूनही जगभर प्रसिद्ध आहेत. सुधा मुर्ती या महिला आणि लहान मुलांसाठी काम करत आहेत.