Published On : Fri, Aug 23rd, 2019

स्टॉल्सवरुन दिली शासनाच्या विविध योजना आणि नवसंकल्पनांतून साकारलेल्या प्रकल्पांची माहिती

नागपूर : ‘इनोव्हेशन पर्व’च्या निमित्ताने शासनाच्या विविध प्रकल्पांची आणि विविध विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती स्टॉल्सद्वारे देण्यात आली. महापौर नंदा जिचकार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘इनोव्हेशन पर्व’मध्ये एक हजारावर नवसंकल्पनांची नोंदणी करण्यात आली. विविध विषयांच्या संदर्भात असलेल्या या संकल्पनांची वर्गवारी करून या संकल्पनांचे सादरीकरणासाठी विविध स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. या स्टॉल्समध्ये संबंधित विभागातील संकल्पना असलेले विद्यार्थी तज्ज्ञांपुढे सादरीकरण करतात.

‘इनोव्हेशन पर्व’मध्ये नोंदणी केलेले पाणी व पर्यावरण, उर्जा, आरोग्याची काळजी, ई-गव्हर्नन्स, कृषी, स्मार्ट सिटी, मोबिलिटी, टाकाउ पदार्थाचे व्यवस्थापन आदी शंभर विषयांवरील नवसंकल्पनांचे सादरीकरण संबंधित विषयाच्या तज्ज्ञांपुढे यावेळी करण्यात आले.

याशिवाय शासनाच्या विविध योजनांची माहितीही विविध स्टॉल्सवरुन देण्यात आली. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळद्वारे मराठा समाजासाठी असलेल्या योजनेतून स्वयंरोजगारासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज परत करण्याच्या योजनेची माहिती या स्टॉलवरुन देण्यात येत आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाद्वारे स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करुन देण्याच्या योजनेचीही माहिती महामंडळाद्वारे दिली जात आहे. भारत सरकारच्या सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या विविध योजनांचीही माहिती स्टॉलवर उपलब्ध आहे.

याशिवाय मनपाच्या समाज कल्याण विभागातर्फे राबविण्यात येणा-या योजनांची माहिती, स्मार्ट सिटीच्या स्टॉलवरुन शहरात सुरू असलेल्या स्मार्ट विकास कामांची माहिती, नागपूर मेट्रोच्या स्टॉलवरून ‘महाकार्ड’ आणि नागपूर मेट्रोच्या फीडर सर्व्हिस विषयी माहिती तसेच नीरी द्वारे तयार करण्यात आलेले ‘निर्धुर’ व ‘ग्रीन डिस्पो’ या मॉडेलची माहिती उपलब्ध करण्यात आली आहे.

दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्र, फॉर्मेकन इनोव्हेशन फाउंडेशनचे मल्टी फन्क्शनल हेल्दी वाटर कॅप्शूल फिल्टर, क्लिक 2 क्लाउडचे स्मार्ट सिटी सिस्टीम सॉफ्टवेअर, औरंगाबाद येथील मिस्टोव्ह टेकचे वाटर सेव्‍हिंग टॅप, ट्रॅव्हलॉसचे ऑफलाईन मॅप फॉर ट्रॅक ॲण्ड हॅक्स, इंजिनिअरींग शिक्षण पूर्ण करुन लाईफ ऑफ चाय या स्टार्टअपद्वारे तरुणांना नवा रोजगाराचा मार्ग देणारे शुभम डाबरे, बर्धमान एअर टर्बाइन व्हेंटिलेटर, शासकीय व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय सीताबर्डी येथील कॉस्मॉलॉजीच्या विद्यार्थीनींनी तयार केलेले इनोव्हेटिव्ह नेल्स, सुरक्षेच्या दृष्टीने तयार मॉडेल व सोलर स्मार्ट सिटी मॉडेल तसेच शासकीय व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय इंदोरा येथील विद्यार्थीनींमार्फत निर्मित रॉयल चॉईस बेबी सेट, शासकीय व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय श्रद्धानंदपेठ येथील विद्यार्थ्यांद्वारे निर्मित बॉटलद्वारे तयार रोप एक्सलेटर आणि हाताने तयार करण्यात आलेल्या विविध मशीन्सचे भाग, क्रिसॉल इन्स्टिट्यूटद्वारे तयार करण्यात आलेले कचरा शोधणारे ड्रोन, भूजल पातळी वाढविण्यासाठी निर्मित परवीयस काँक्रीट ब्लॉक, इंडियन कौंन्सिल फॉर टेक्निकल रिसर्च ॲण्ड डेव्‍हलपमेंट अंतर्गत स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी तयार करण्यात आलेले उद्योग कोडीओसिटी, कौशल्य विकास व उद्योग विभागाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाद्वारे निर्मित ऑटोमेटिक मीटर रिडींग ॲण्ड थेप्ट डिटेक्शन व बायडायरेक्शन सेंटर कम एनर्जी सेव्हरचे मॉडेल, ट्रू एनर्जी द्वारे तयार करण्यात आलेले सेव्ह मिलीऑन्स बाय अ फ्यू हन्डरेड मॉडेल, स्वच्छ असोसिएशनद्वारे टाकाउपासून सुंदर व टिकाउ वस्तूंची निर्मिती, एमजी ऑटोमेशन टेक्नॉलॉजीद्वारे तयार करण्यात आलेले स्मार्ट सिटीशी संबंधित उत्पादने, नागपूर फर्स्ट चॅरिटेबल ट्रस्टद्वारे विदेशात राहुन आपल्या शहराचे नाव मोठे करणारे व महत्वपूर्ण कार्यासाठी विदेशातील नागपूरकरांना एकत्रिक आणण्याचे काम दर्शविणारे स्टॉल अशा विविध स्टॉल्सवरून माहिती उपलब्ध करण्यात आली आहे.