पिके पडू लागले पिवळे, धान, कापूस, सोयाबीन, तूर, पिकाचे नुकसान, शेतकरी चिंतेत
कामठी :- कामठी तालुक्यात येणाऱ्या परिसरात शेतकरी मोठ्या प्रमानात सोयाबीन व धान, कापूस, तूर पिकाची लागवड करतात . यावर्षीच्या संततधार पावसामुळे सोयाबीन धान, कापूस, तूर पिके पाण्याखाली आल्याने शेतकऱ्याला फटका बसत आहे त्यामुळेच शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले असून शेतकरी वर्ग चिंतेत आहे.सोयाबीन पिकावर तंबाखुची पाने खाणारी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असून पिके पिवळे पडू लागले आहेत.
कामठी तालुक्यातील यावर्षीच्या पावसाच्या पर्जन्यमानाच्या परिस्थितीचा आढावा घेतला असता आजपावेतो 1065 मी मी पावसाची नोंद आहे.तर शेतकऱ्यांनी सन 2019-20अंतर्गत 25 हजार 257 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केलेले आहे त्यापैकी आजपावेतो 24 हजार 374 हॅकटर क्षेत्रावर पेरणी झाली असून यामध्ये कापूस 5639 हॅकटर, सोयाबीन 3442 हॅकटर, धान रोवणी 10 हजार 182 हॅकटर, तूर 1660 हॅकटर, भाजीपाला 2033 हॅकटर वर पेरणी करण्यात आलेली आहे.पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाने दगा दिल्याने अनेकांना दुबार पेरणी करावी लागली काहींनी तर शेतच पडीत ठेवले होते मात्र जुलै महिन्यापासून झालेल्या जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱयांनी पेरणीसह रोवणीच्या कामाला ही गती दिली.सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी हलक्या प्रतिसह भारी धानाची सुद्धा लागवड केली आहे. धानाची 100 टक्के रोवणी झालेली असून 10 हजार 182 हॅकटर क्षेत्रावर रोवणी झालेली आहे .मात्र या सततच्या सुरू असलेल्या पावसाने धान पिकावर इटीएल च्या खाली तपकिरी तुडतुडे हिरवे तुडतुडे आले असून या धान पिकावर पाने गुंडाळणारी अळी चा प्रादुर्भाव झालेला आहे.
कापूस पिकावर मावा , तुडतुडे या रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव झाला असून पाने पोखळणाऱ्या अळीचा अल्प प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून कापूस पिकाची पाली फुले व बोंडाची संख्या कमी दिसून येत आहे .
सोयाबीन पीक पकवतेच्या अवस्थेत असून अतिपावसामुळे उशिरा पेरणी झालेल्या सोयाबीनची पाने काही ठिकाणी पिवळी पडली आहेत तर सोयाबीन पिकावर तंबाकुची पाने खानारी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.तर तूर पिकावर पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.या प्रकारच्या रोगाच्या प्रभावाने शेतकरी पुन्हा संकटात सापडल्याने शेतकरी चिंतातुर होऊन बसलेला आहे.पीक उत्पादना बाबत अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासन प्रशासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी जोर धरत आहे.
संदीप कांबळे कामठी