Published On : Thu, Sep 26th, 2019

आयुष्यमान भारत दिवसानिमित्त मिरवणूक

कामठी :-येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात प्रधानमंत्री आयुष्यमान भारत दिवस साजरा करण्यात आला.या आयुष्यमान योजने अंतर्गत प्रधानमंत्री जण आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेस नुकताच एक वर्ष झाला असून या योजनेअंतर्गत कित्येकांना मोफत उपचार आणि आयुष्यमान भारताचे स्वप्न साकार होत आहे .

तेव्हा या योजनेस एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शासकीय उपजिल्हा रुग्णालयातुन प्रभातफेरी काढून सदर योजनेचा लाभ घेण्याचे घोषवाक्यातून आव्हान करण्यात आले तसेच डेंग्यू, कृष्ठरोग, टी बी व कँसर या रोगाविषयी खबरदारी घेण्याचे नारेबाजी करीत जनजागृती करण्यात आले.

या प्रभातफेरी चे उद्घाटन वैद्यकीय अधीक्षक डॉ धीरज चोखांद्रे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली.याप्रसंगी कृष्ठरोगतज्ञ मनोहर येळे, धावडे, फुलझेले, सावते, राजू कुकुर्डे, आशा वर्कर, स्वयंसेवक आदी सहभागी होते.

संदीप कांबळे कामठी