Published On : Thu, Sep 26th, 2019

कामठीत चार दिवसीय शिक्षकांचे प्रशिक्षण

नववी, दहावी चे गुरुजीं शिकताहेत मूल्यमापनाचे धडे

कामठी :- नववी व दहावीच्याया विद्यार्थ्यांना नव्या मूल्यमापनाची पद्धती समजाविण्यासाठी कामठी येथील सेंट जोसेफ हायस्कुल मध्ये 24 ते 27 सप्टेंबर पर्यंत शिक्षकांचे चार दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून या प्रशिक्षणातून कामठी, पारशिवणी, रामटेक, सावनेर या चार तालुक्यातील नववी व दहावी चे शिक्षक मूल्यमापनाचे धडे शिकत आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यातर्फे 8 ऑगस्ट च्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार इयत्ता नववी व दहाविसाठी सुधारित मूल्यमापन आराखडा व गुणविभागणी तयार करण्यात आली आहे , पूर्वीप्रमाणे 80:20 पॅटर्न लागू करण्यात आला आहे यासंदर्भातच सविस्तर मार्गदर्शनासाठी नोडल अधिकारी म्हणून कामठी पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी कश्यप सावरकर यांच्या मुख्य उपस्थितीत सदर चार तालुक्यातील नववी व दहावीच्या शिक्षकाना मूल्यमापणाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.या प्रशिक्षणातून मूल्यमापन बाबत सविस्तर माहिती सांगून सुधारित मूल्यमापन आराखडा व कृतीपत्रिका तयार करताना घ्यावयाची काळजी यावर माहिती देण्यात आली तसेच गुणविभागणी कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले.

संदीप कांबळे कामठी