Published On : Thu, Jul 18th, 2019

इंडोनेशियन प्रतिनिधींनी घेतली सभापती, संसदीय कार्य मंत्र्यांची भेट

Advertisement

मुंबई : इंडोनेशियन संसदेचे प्रतिनिधी, इंडोनेशिया वकिलाती चे प्रतिनिधी अशा एकूण 22 सदस्यांनी विधानपरिषद सभापती रामराजे नाईक- निंबाळकर आणि संसदीय कार्य मंत्री विनोद तावडे यांची विधानभवनात भेट घेतली. आगामी काळात महाराष्ट्र व इंडोनेशियामध्ये व्यापारी व सांस्कृतिक संबंध दृढ व्हावेत, अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

या भेटीदरम्यान इंडोनेशियन शिष्टमंडळाने महाराष्ट्र विधानमंडळाची कामकाज पद्धत आणि इंडोनेशिआच्या संसदीय कामकाज पद्धतीच्या माहितीची देवाणघेवाण केली. यावेळी विधानपरिषद सभापतींचे सचिव म.मु. काज, विधानमंडळाचे अवर सचिव सुनील झोरे व अन्य अधिकारी उपस्थित होते.

इंडोनेशिया संसदीय शिष्टमंडळाचे प्रमुख टेन्क्यू अझहारी यांच्या अध्यक्षतेखाली हे शिष्टमंडळ आले होते.

विधिमंडळाच्या कामकाजाबद्दल माहिती देऊन श्री. नाईक निंबाळकर म्हणाले की, महाराष्ट्र आणि इंडोनेशियामध्ये येणाऱ्या काळात सांस्कृतिक, पर्यटन क्षेत्रात देवाणघेवाण व्हावी. तसेच महाराष्ट्रात चित्रपट क्षेत्र मोठया प्रमाणात विस्तारत असल्याने या क्षेत्रातही दोन्ही प्रातांत सहकार्य होईल.

श्री. तावडे यावेळी म्हणाले, भारत आणि इंडोनेशियाच्या संसदीय प्रवासाला 70 वर्षे पूर्ण होत आहेत. याशिवाय भारत आणि इंडोनेशिया यामध्ये आणखी एक महत्वाचा दुआ आहे ते म्हणजे रामायण. इंडोनेशियाला आर्कषण वाटणारे बॉलीवूड महाराष्ट्रात असून येणाऱ्या काळात इंडोनेशियाने महाराष्ट्रात सांस्कृतिक, व्यापार क्षेत्रात गुंतवणूक करावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

इंडोनेशियाच्या एच विधीमंडळाच्या आयोग एकचे अध्यक्ष टेन्क्यू अझहारी यांनी येणाऱ्या काळात महाराष्ट्राबरोबर सामंजस्य करार करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले.