Published On : Fri, Jun 5th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात अल्पवयीन मुलींशी अश्लील कृत्य; 64 वर्षीय आरोपीला न्यायालयाकडून सश्रम कारावासाची शिक्षा!

Advertisement

नागपूर : अल्पवयीन मुलींशी अश्लील वर्तन आणि विनयभंग केल्याप्रकरणी नागपूरच्या विशेष पोक्सो न्यायालयाने 64 वर्षीय आरोपीला दोषी ठरवत सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. मा. जिल्हा न्यायाधीश-10 तथा तदर्थ सत्र न्यायाधीश विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. एस. मौदेकर यांनी 3 जून 2026 रोजी हा निकाल दिला.

धंतोली पोलीस ठाण्यात 2021 मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपी सतीश केशवराव रोकडे (वय 64, रा. हनुमान नगर, नागपूर) याच्याविरुद्ध सादर करण्यात आलेले साक्षी-पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने त्याला दोषी ठरवले.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड संहितेच्या कलम 354 अंतर्गत 5 वर्षे सश्रम कारावास व 10 हजार रुपये दंड, पोक्सो कायद्याच्या कलम 10 अंतर्गत 7 वर्षे सश्रम कारावास व 20 हजार रुपये दंड, तसेच कलम 12 अंतर्गत 3 वर्षे सश्रम कारावास व 5 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास अतिरिक्त कारावासाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे.

प्रकरणानुसार, 30 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री रहाटे कॉलनी परिसरात एका कार्यक्रमासाठी आलेल्या 35 वर्षीय महिलेच्या अल्पवयीन मुलीला आरोपीने खोली दाखवण्याच्या बहाण्याने नेऊन तिच्याशी अश्लील वर्तन केले व विनयभंग केला. तसेच फिर्यादीच्या इतर नातेवाईकांच्या अल्पवयीन मुलींसोबतही अश्लील गैरकृत्य केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

Advertisement

फिर्यादीच्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. आरोपीला 11 डिसेंबर 2021 रोजी अटक करण्यात आली होती.
या प्रकरणाचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती रामटेके यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यात सरकार पक्षातर्फे अॅड. रश्मी खापर्डे यांनी युक्तिवाद केला, तर आरोपीच्या बाजूने अॅड. जॉन राफेल यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी अचल हरगुडे आणि सुष्मा बेले यांनीही खटल्याच्या सुनावणीत महत्त्वाची भूमिका बजावली.

Advertisement
Nagpur शराब के पैसों को लेकर भाई ने भाई की चाकू से हत्या! #NagpurNews #Crime #MurderCase #News

Nagpur शराब के पैसों को लेकर भाई ने भाई की चाकू से...

16 साल की नाबालिग को शादी का झांसा देकर यौन शोषण का आरोप.. #NagpurNews #POCSOCase #Crime #News

16 साल की नाबालिग को शादी का झांसा देकर यौन शोषण का...

Jalgaon में नकली देशी शराब की फैक्ट्री का भंडाफोड़!#FakeLiquor #MaharashtraNews #Excise #CrimeNews

Jalgaon में नकली देशी शराब की फैक्ट्री का भंडाफोड़!#FakeLiquor #MaharashtraNews #Excise #CrimeNews

Nagpur Crime: 14 साल की बेटी के कथित यौन शोषण का आरोप #NagpurNews #POCSOCase #NagpurCrime #News

Nagpur Crime: 14 साल की बेटी के कथित यौन शोषण का आरोप...

एनआईटी कार्यालय में महिला कर्मचारी से छेड़छाड़ का आरोप

एनआईटी कार्यालय में महिला कर्मचारी से छेड़छाड़ का आरोप

भिवंडी में खेत की जमीन पर कब्जे का आरोप

भिवंडी में खेत की जमीन पर कब्जे का आरोप

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges