Published On : Mon, Mar 8th, 2021

पोलिसांच्या सतर्कतेने खुनाचा प्रसंग टळला

– 28 प्रकारचे प्राणघातक हत्यारे जप्तसह आरोपीस अटक

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या घोरपड येथे आई सोबत शेजारी महिलेने केलेल्या भांडणाचा वचपा त्या महिलेचा खून करून काढण्यासाठी हातात धारदार लोखंडी तलवार व दुसऱ्या हातात लोखंडी हातोडी घेऊन जोरजोरात अश्लील शिवीगाळ देत ड्रॅगन पॅलेस मार्गाने जात असलेल्या आरोपीला रात्रगस्तीवर असलेले पोलीस कर्मचारी राहुल वाघमारे व तेजराम सरोटे यांनी त्वरित त्या आरोपी तरुणास ताब्यात घेतल्याने रागाच्या भ्रमात त्याच्या हातून एका महिलेचा होणारा खुनाचा अनर्थ टळला.

तसेच आरोपीच्या घरातील झडती घेऊन अवैधरित्या बाळगून ठेवलेला शस्त्रसाठा जप्त करण्यात आला ज्यामध्ये 2 नग लोखंडी चक्र, 4 नग त्रिशूल, 7 नग लोखंडी भाले, 1 नग लोखंडी रॉड, 4 नग फरसा, 8 नग दांडपट्टा, 2 नग तलवार, 2 नग लोखंडी हातोडी असे एकूण 28 प्रकारचे शस्त्रसाठा जप्त केल्याची कारवाही काल रात्री साडे बारा दरम्यान केली असून अटक आरोपीचे नाव हर्षल उर्फ हरीष संतोष आंमधरे वय 19 वर्षे रा घोरपड कामठी असे आहे.

ही यशस्वी कारवाही डी सी पी निलोत्पल, एसीपी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे, सहाययक पोलीस निरीक्षक कननाके,पोलीस उपनिरीक्षक कार्वेकर, डी बी स्कॉड चे पप्पू यादव, अखिलेश रॉय, मंगेश लांजेवार, मंगेश यादव, राजेंद्र टाकली कर,राहुल वाघमारे, सराटे, सुधीर कनोजिया, उपेंद्र यादव, संदीप भोयर यांनी केले असून पुढील तपास सुरू आहे