Published On : Wed, Jun 2nd, 2021

हिंगणा औद्योगिक वसाहतीत वीज वाहिनीची उंची वाढवली

Advertisement

नागपूर: हिंगणा औद्यौगीक वसाहतीत अवजड वाहनांच्या वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या एका उच्च वीज वाहिनीची उंची वाढविण्याचे काम बुधवार दिनांक २ जुन रोजी महावितरणकडून करण्यात आले हिंगणा पोलिस ठाण्याजवळ असणाऱ्या या उच्च दाब वीज वाहिनीची उंची सततच्या डांबरीकरणामुळे कमी झाली होती.यामुळे येथून जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी महावितरणची वीज वाहिनी अडथळा ठरली होती.कमी उंचीमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली होती.महावितरणच्या बुटीबोरी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रफुल लांडे आणि हिंगणा उपविभागीय कार्यालयाचे अतीरिक्त कार्यकारी अभीयंता संजय विटणकर यांनी सदर वीज वाहिनी स्थानांतरित करण्याचा निर्णय घेतला.

यासाठी जुन्या वीज खांबाच्या एवजी ४ नवीन वीज खांब नवीन जागी उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला.या कामासाठी बराच काळ वीज पुरवठा बंद ठेवावा लागणार होता सोबतच रस्त्याच्या मधोमध काम करायचे असल्याने वाहतूक कोंडी होण्याची शक्यता होती.

Advertisement
Advertisement

अखेर बुधवारी हिंगणा औद्योगिक क्षेत्रात साप्ताहिक सुट्टी असते.याच दिवशी कामाचे नियोजन करून ते पूर्ण करण्याचे ठरविण्यात आले.पोलीसांच्या वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक पाठक यांनी वाहतूक नियंत्रणाची जवाबदारी सांभाळली.सकाळी ९ वाजताच्या सुमारास कामाला सुरुवात करण्यात आली. प्रशीक्षीत मनुष्यबळा सोबतच क्रेनची मदत घेऊन दुपारी ४ वाजता हे काम पूर्ण करण्यात आले.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement