Published On : Wed, Jun 2nd, 2021

बसपा गटनेता जितेंद्र घोडेस्वार स्वीकारला पदभार

Advertisement

महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले अभिनंदन

नागपूर : बहुजन समाज पार्टीचे मनपा गटनेता जितेंद्र घोडेस्वार यांनी बुधवारी (ता.२) पदभार स्वीकारला. मनपा मुख्यालयातील बसपा गटनेता कार्यालयामध्ये आयोजित छोटेखानी कार्यक्रमामध्ये महापौर दयाशंकर तिवारी यांनी पुष्पगुच्छ देउन नवनिर्वाचित गटनेता जितेंद्र घोडेस्वार यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी उपमहापौर मनीषा धावडे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, नगरसेविका भावना लोणारे, वंदना चांदेकर, भाग्यश्री कानतोडे, ममता सहारे, मंगला लांजेवार, नगरसेवक परसराम मानवटकर, इब्राहिम तौफीक अहमद, नरेन्द्र वालदे, गोपीचंद कुमरे, बसपाचे प्रदेश महासचिव नागोराव जयकर, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, जिल्हा प्रभारी नितीन सिंगाळे, मीडिया प्रभारी उत्तम शेवळे, माजी नगरसेवक गौतम पाटील, माजी जिल्हा प्रभारी योगेश लांजेवार, माजी जिल्हाध्यक्ष विलास सोमकुवर, माजी शहराध्यक्ष प्रकाश गजभिये, उमेश मेश्राम, राजीव भांगे, सदानंद जामगडे, चंद्रशेखर कांबळे, प्रवीण पाटील, सुमीत जांभुळकर, शशीकांत मेश्राम, प्रताप सूर्यवंशी, जितेंद्र बन्सोड आदी उपस्थित होते.

यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी पुष्पगुच्छ देउन व पेढा भरवून जितेंद्र घोडेस्वार यांचे अभिनंदन केले. मनपामध्ये सत्ता कुणाचीही सत्ता असो वा सभागृहामध्ये कितीही विरोध असो शहराच्या विकासासाठी, जनतेच्या प्रश्नांसाठी सर्व एकत्र येत असतात ही महानगरपालिकेची परंपरा आहे. वैशाली नारनवरे यांच्या उत्तम कार्यकाळानंतर आज बसप गटनेतापदी जितेंद्र घोडेस्वार यांची नियुक्ती ही अभिनंदनीय आहे. मनमिळावू, काम करण्याची लगबग, अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणून ओळख असलेले जितेंद्र घोडेस्वार विषयाचा संपूर्ण अभ्यास करून सभागृहामध्ये मत मांडतात, हा त्यांच्यातील आणखी एक उत्तम गुण आहे. लोकांसाठी भांडणारा नेता जेव्हा पदभार स्वीकारतो तेव्‍हा आपसूकच अपेक्षा वाढतात. त्या श्री. घोडेस्वार यांच्याबाबतही वाढल्या आहेत. लोकांच्या सर्व अपेक्षांवर ते खरे उतरून नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यामध्ये यशस्वी ठरतील, असा विश्वास महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी व्यक्त केला.

विरोधी पक्षनेता तानाजी वनवे यांनी सहकारी मित्र पक्षाचा पक्षनेता म्हणून जितेंद्र घोडेस्वार यांच्या नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.

नवनिर्वाचित बसपा गटनेता जितेंद्र घोडेस्वार यांनी त्यांच्या नियुक्तीबद्दल पक्षश्रेष्ठींचे आभार मानले. शहरातील बहुजन, मागासवर्गीयांना अद्यापही त्यांच्या समस्यांसाठी भटकावे लागत आहे. त्यामुळे या विषयावर सभागृहामध्ये प्रसंगी भांडून सर्वांना समान न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.