Published On : Tue, Oct 3rd, 2017

विशेष समित्यांचा कामांचा वेग वाढवा

Advertisement

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या विविध विशेष समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामे सुरू केलेली आहेत. या कामांमध्ये ज्या-ज्या प्रशासकीय अडचणी येत आहेत, त्या तातडीने दूर करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश देत इतर अडचणींवर तोडगा काढण्यासाठी समिती पदाधिकाऱ्यांसोबत तातडीने बैठकांचे नियोजन करण्याचे आश्वासन महापौर नंदा जिचकार यांनी विषय समितींच्या सभापतींना दिले.

प्रशासनाच्या कामाला गती प्राप्त करून देण्याकरिता महानगरपालिकेने गठित केलेल्या दहा विषय समित्यांच्या कामाचा आढावा महापौर नंदा जिचकार यांनी मंगळवारी (ता. ३) घेतला. यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, मनपातील भाजपच्या प्रतोद दिव्या धुरडे यांच्यासह स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे सभापती संजय बंगाले, वैद्यकीय सेवा व आरोग्य समितीचे सभापती मनोज चापले, विधी विशेष समितीच्या सभापती ॲड. मिनाक्षी तेलगोटे, शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी विशेष समितीच्या सभापती चेतना टांक, क्रीडा समितीचे सभापती नागेश सहारे, महिला व बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे, जलप्रदाय समितीचे सभापती राजेश घोडपागे, अग्निशमन व विद्युत समितीचे सभापती ॲड. संजय बालपांडे, उपसभापती अभय गोटेकर, प्रमोद तभाने, श्रद्धा पाठक, प्रमोद चिखले, नगरसेवक पिंटू झलके आदी उपस्थित होते.

यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी समितीनिहाय कामांचा आढावा घेतला. सभापती, उपसभापतींनी त्यांना प्रशासकीय कामात येत असलेल्या अडचणी सांगितल्या. आतापर्यंत समितीच्या माध्यमातून घेतलेल्या बैठका, प्रत्यक्ष केलेली कामे आणि भविष्यातील कामासाठी तयार केलेले प्रस्ताव आणि नियोजन याचीही सविस्तर माहिती दिली. विविध समितीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी प्रशासकीय दृष्टिकोनातून माहिती दिली.

समितीच्या पदाधिकाऱ्यांना ज्या-ज्या अडचणी आहेत, त्या तातडीने महापौर कार्यालयाला कळवाव्यात. ज्या विषयासंदर्भात अडचणी आहेत, त्या विषयावर तातडीने बैठक घेण्याचे निर्देश त्यांनी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना दिले. अडचणींवर मात करून, अन्य अनुभवी सदस्यांशी चर्चा करून प्रत्येक समितीचे कार्य वेगाने पुढे न्या. आपण नेहमी सोबत आहोत, असे महापौर नंदा जिचकार यांनी प्रत्येक समितीच्या सभापती, उपसभापतींना आश्वस्त केले.

बैठकीला उपायुक्त डॉ. रंजना लाडे, मुख्य अभियंता विजय बनगीरवार, सहायक संचालक (नगररचना) सुप्रिया थूल, कार्यकारी अभियंता डी.डी. जांभूळकर, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जैस्वाल, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर, कार्यकारी अभियंता पोहेकर, स्थावर अधिकारी आर. एस. भुते, सहायक आयुक्त (कर) मिलिंद मेश्राम, आरोग्य अधिकारी डॉ. अनिल चिव्हाणे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, अभियोक्ता व्ही. डी. कपले, क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी, श्री. पोहेकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.