Published On : Fri, Feb 12th, 2021

कोरोना बाधितांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा : मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांचे निर्देश

नागपूर : नागपूरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन: वाढत आहे. कोव्हिड – १९ बाधित रुग्णांची संख्या सतत वाढल्यामुळे यावर नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना आखण्याबाबत नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांनी गुरुवारी (११ फेब्रुवारी) ला वरिष्ठ अधिका-यांची, वैद्यकीय अधिका-यांची तसेच झोनल वैद्यकीय अधिका-यांची बैठक घेवून कोरोना बाधितांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्याचे निर्देश दिले.