नागपूर : शहरात पुन्हा एकदा हिट अँड रनची धक्कादायक घटना समोर आली आहे. मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे हा संपूर्ण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असतानाही पाच दिवस उलटून गेले तरी आरोपी चालक पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
महाल परिसरातील झेंडा चौक येथील रहिवासी मुकुंद बाभरे (72) हे रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास बडकस चौकातून आयची मंदिराच्या दिशेने मॉर्निंग वॉकसाठी जात होते. गजानन मंदिराजवळील रस्त्यावरून जात असताना भरधाव वेगाने आलेल्या कारने त्यांना जोरदार धडक दिली.
धडकेनंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या बाभरे यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या पाच दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावत गेली आणि गुरुवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असूनही आरोपी चालक अद्याप मोकाट असल्याने मृताच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे. आरोपीला तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
हायटेक पोलिसिंगचे दावे केले जात असताना सीसीटीव्ही पुरावे उपलब्ध असूनही आरोपीपर्यंत पोलीस का पोहोचू शकले नाहीत, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पाचपावली में अवैध कत्लखाने का पर्दाफाश #NagpurNews #Panchpaoli #PoliceAction #CrimeNews #newsupdate
पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews...
नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews...
हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate
नागपुर में दिव्यांगजनों को मिला नया सहारा #HyundaiMobisIndia #DisabilitySupport #NGO #NagpurNews
उद्धव ठाकरे के जन्मदिन पर नागपुर में भव्य महाआरती #UddhavThackeray #nagpurnews #news...





