Published On : Wed, Jan 31st, 2018

रेशींमबाग मैदान येथे महिला उद्योजिका मेळाव्याचे उद्घाटन

NMC Nagpur

नागपूर: नागपूर महानगरपालिका महिला व बालकल्याण समिती, समाजकल्याण विभाग, दीनदयाल अंतोदय राष्ट्रीय उपजिविका योजनेअंतर्गत दिनांक ४ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी दरम्यान आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याचे भूमिपूजन बुधवार (ता.३१) ला उपमहापौर दीपराज पार्डीकर यांच्याहस्ते रेशींमबाग मैदान येथे करण्यात आले. यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे, समिती सदस्य दिव्या धुरडे, उपायुक्त डॉ.रंजना लाडे प्रामुख्याने उपस्थित होते.

विदर्भातील महिला बचत गटांना उद्योगासाठी चालना मिळण्यासाठी या मेळाव्याचे नागपूर महानगरपालिकेद्वारे आयोजन करण्यात येत असते. या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रमदेखील आयोजित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला समिती उपसभापती श्रद्धा पाठक, सदस्य रिता मुळे, क्रिडा समिती सभापती नागेश सहारे, हनुमाननगर झोन सभापती भगवान मेंढे, नगरसेविका स्नेहल बिहारे, हनुमाननगर झोन सहायक आयुक्त राजेश भिवगडे, कार्यकारी अभियंता कृष्णकुमार हेडाऊ, संजय पडोळे, समाजकल्याण विभागाचे पाचोडे, बागडे, शारदा गडकर, ज्योत्सना देशमुख, निमा गोमगाटे, विनय त्रिकोलवार, नूतन मोरे उपस्थित होते.