Published On : Thu, Jul 25th, 2019

ग्रा प किन्हाळमाकळी येथे विविध विकास कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न

आ मेघे यांची विशेष उपस्थिती

नागपूर – तालुक्यातील ग्रा प किन्हाळमाकळी येथे नुकतेच विविध विकास कामाचा लोकार्पण सोहळा हिंगणा विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर मेघे यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी आ समीर मेघे यांच्या स्थानिक निधीतून ग्रा प किन्हाळमाकळी अंतर्गत मौजा कन्हाळगाव पठार येथील ५ लक्ष रुपये किमतीच्या रस्त्याचे खडीकरण,सन २०१८-१९ च्या ग्रामविकास निधीतून खापरी (सुभेदार) येथील २.५० लक्ष रुपयांचा सिमेंट रस्ता,२.५० लक्ष रुपयांचा जयपूर पठार येथील सिमेंट रस्ता आदी कामाचे लोकार्पण करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून आ समीर मेघे,अध्यक्ष म्हणून जी प सदस्य रुपराव शिंगणे तर प्रमुख अतिथी म्हणून प स सदस्य दिलीप नंदागवळी,रेखा मसराम,उर्मिला मिलमिले व भाजपा नागपूर ग्रामीण महामंत्री अनिल ठाकरे हे प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी या कार्यक्रमाला श्रीकांत चिकणकर, उमाकर भुसारी,मुरलीधर गिरसावळे,हरिभाऊ भोंग,मधुकर मोहितकर,रामचंद्र नामुर्ते,नत्थु बेलेकर,शालीक लिंगे,अविनाश नागपुरे,राहुल भोयर,आशिष डोईफोडे तसेच गावातील शेकडो नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरपंच चंदा श्रीकांत चिकनकर,उपसरपंच सागर धांडे व सर्व ग्रा प सदस्यांनी परिश्रम घेतले.