Published On : Thu, Jul 25th, 2019

पुरुषोत्तम विध्यानिकेतण येथे व्यसन मुक्ती कार्यक्रम संपन्न

व्यसनमुक्तीची विध्यार्थ्यांना दिली शपथ
ऊर्जा फौंडेशन चा उपक्रम

नागपूर :- देशातील युवा पिढी ही आज मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन झाली आहे.कामधंदा किंवा कुठला उद्योग न करता बिडी,सिगारेट,तंबाखू हेच काय तर दारू पिऊन आजचे युवा हे दारूच्या गुत्यावर किंवा पान टपरी वर झिंगत असल्याचे चित्र आज सगळीकडे दृतीपथास पडते.व्यसनाधीनतेने पोखरून निघालेल्या युवा पीडिला व्यसनापासून दूर करून त्यांना उत्तम व्यक्ती म्हणून जीवन जगता यावे म्हणून ऊर्जा फौंडेशन कार्य करीत असल्याचे माहिती संस्थेचे अध्यक्ष रितेश पांडे यांनी बोरखेडी (रेल्वे) येथील पुरुषोत्तम विध्यानिकेतन येथे आयोजित व्यसनमुक्ती कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना सांगितले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक आनंद गाणार तर प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार संदीप बलविर होते.विध्यार्थ्यांना व्यसन असावे पण विडी,तंबाखू,खर्रा,गुटखा यांचे नाही तर अभ्यासाचे व्यसन असावे.विद्याव्यासांगाच्या नशेत स्वतःला इतके बुडवून घ्यायचे की आता केलेला अभ्यास हा भविष्यातही लक्षात राहील असे मत आपल्या अध्यक्षीय भाषणात गाणार यांनी व्यक्त केले.

यावेळी विध्यार्थ्यांना व्यसन न करण्याची व दुसर्यांना व्यसनापासून परावृत्त करण्याची शपथ देण्यात आली.कार्यक्रमाचे संचालन ऊर्जा फौंडेशन चे अभिषेक मिश्रा यांनी तर आभार सचिन पाटील यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता ऊर्जा फौंडेशन चे दीपक आसुदानी,आनंद आसुदानी,वृषभ शेंडे,शिवम मिश्रा,श्रावण शर्मा,रुष सिंध,अखिलेश तिवारी,पंकज तिवारी,विक्की कोचे,सुरज जैस्वाल तर पुरुषोत्तम विध्यानिकेतन चे सहाय्यक शिक्षक विनोद गिरी,मनोज गोडघाटे सह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.