| | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Feb 9th, 2021

  शिवशक्तीनगरात शेडचे उदघाटन.

  नागपुर : मानेवाडा रिंग, रोड दक्षिण नागपूर शिवशक्तिनगर नं. 2 व 3 हनुमान मंदिर परिसरात दक्षिणचे आमदार मा.मोहन मतेच्या आमदार निधितून शेड निर्माण करण्याकरिता भूमिपूजनाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला असून आमदार मोहन मते यांच्या हस्ते पार पडला.

  याप्रसंगी भूमिपूजनाच्या कार्यक्रमात महामंत्री विनोद कडू, वार्ड अध्यक्ष बाबारावजी तायडे, नगरसेवक राजेंद्र सोनकुसरे , नगरसेविका सौ.मंगला खेकरे, प्रवीण ठाकरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

  व वस्तितील सर्वश्री उकंडराव चौधरी, भारद्वाजजी, गेडामजी, भालचंद्र दाणी हेंमत वाघाडे, राजू वाघाडे, अशोकराव डाफ, विकास हिंगे, प्रदीप गणोरकर, संजय गाडगे, देवराव प्रधान, भागवत बेसरवार सौ. इंदुताई देवरावजी राठोड व यावेळी वस्तीतील नागरिकगण उपस्थित होते. संचालन उकंडराव चौधरी यांनी मानले तर मदनजी वराडे यांनी आभार व्यक्त केले.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145