Published On : Wed, Aug 21st, 2019

पारशिवनी तालुकास्तरीय शालेय क्रिडा स्पर्धाचे थाटात उदघाटन

पावसाळी शालेय क्रिडा स्पर्धा दि .२० ते २२ ऑगस्ट पर्यंत आयोजन.

कन्हान : – जिल्हा क्रिडा परिषद नागपूर व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय नागपुर व्दारे स्थानिक बळीरामजी दखने हायस्कुल कन्हानच्या प्रांगणात दि.२० ते २२ ऑगस्ट ला पावसाळी पारशिवनी तालुका स्तरीय सांघिक व मैदानी क्रिडा स्पर्धाचे थाटात उदघाटन करण्यात आले.

महाराष्ट्र शासनाच्या क्रिडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा परिषद नागपुर व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय नागपुर व्दारे सन २०१९ – २० या शैक्षणिक वर्षात पावसा ळी तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धाचे मंगळवार (दि.२०) ला बळीराम दखने हायस्कुल कन्हान च्या पटांगणात शाळेच्या मुख्याध्यापिका विशाखा ठमके यांच्या अध्यक्षेत प्रमुख अतिथी आंतराष्ट्रीय खेडाळु मा श्रीमती हेलन जोसेफ, आंतराष्ट्रीय खेळाडु, मास्टर अॅथेलेटिक्स व योग गुरु श्री राजेन्द्र चौधरी सर, कांद्रीचे सरपंच बळवंत पडोळे, नगरसेवक राजेंद्र शेंदरे, तालुका क्रिडा सचिव माधव काठोके आदीने दिप प्रज्वलित करून उदघाटन केले.

मान्यवरांच्या हस्ते कबड्डी मैदानाचे पुजन व बळीराम दखने हायस्कूल व धर्मराज विद्यालय कांद्री चा दर्शनीय कबड्डी सामना सुरू करून पावसाळी तालुका स्तरिय क्रिडा स्पर्धाची थाटात सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्र संचालन सचिन अल्लडवार यांनी तर आभार ज्ञानप्रकाश यादव सरांनी व्यकत केले. शाळेचे हरीहर डहारे सर, विलास उईके सर, अमीत थटेरे सर तालुक्यातील सर्व शारीरिक (क्रिडा) शिक्षकांनी विशेष सहकार्य केले. कबड्डी स्पर्धा करिता तालुक्यातील १७ संघानी सहभाग घेतला असुन मोठय़ा संख्येने शालेय विद्यार्थी खेडाळु सहभागी झाले.

तालुका स्तरिय पावसाळी क्रिडा स्पर्धेत पारशिवनी तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सांघिक- कबड्डी, खो – खो, व्हॉलीबाल, फुटबॉल व मैदानी स्पर्धा अश्या एकुण दहा खेळाच्या स्पर्धा घेण्यात येणार आहे.