Published On : Mon, Sep 23rd, 2019

तारसा चौकात आरोपीचा देशी कट्टा जप्त करून आचारसंहितेचे उदघाटन

कन्हान: – येथील मुख्य चौक तारसा रोड येथे आरोपी सुनिल यादव यांची झळती घेतले असता त्याच्या जवळुन देशी कट्टा स्थानिक गुन्हे शाखेने कार्यवाही करून जप्त केल्याने लागु झालेल्या आदर्श आचारसंहितेचे सर्व प्रथम जिल्हयात कन्हान शहरात उदघाटन करण्यात आले.

प्राप्त माहीती नुसार रविवार (दि. २२) ला सायंकाळी ७ वाजता दरम्यान तारसा रोड चौक वैद्य मेडिकल स्टोर्स सामोर सार्वजनिक रस्त्यावर उभा असलेल्या सुनिल वंसराज यादव वय २९ वर्ष रा. खदान नं ३ मश्जिद च्या जवळ याची गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीसांनी अंगझडती घेतली असता ट्रँक पँट च्या आत एक लोंखडी देशी कट्टा मिळुन आल्याने पुढील कारवाईस आरोपी सुनिल ला अटक करून देशी कट्टा किंमत १२ हजार चा मुद्देमाल जप्त करून भादंवि ३,२५ भारतीय शस्त्र कायद्यान्वये सह कलम १३५ नुसार कार्यवाही करून कन्हान पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले असुन पुढील कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शन गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल जीट्टटवार यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक सचिन मट्टे, सहाय्यक फौजदार लक्ष्मीप्रसाद दुबे , सुरेश परमार, शैलेश यादव, सत्यशिल कोठारे, विरेंद्र नरड, प्रणय बनाफर, साहेबराव बाहाडे आदी च्या पथकाने परिश्रम घेऊन कार्यवाही यशस्वी केली.