Published On : Tue, Jul 30th, 2019

बोखारा फाटा-बर्डी बससेवेचे उद्‌घाटन

नागपूर: प्रभाग ११ अंतर्गत येणाऱ्या रजत हाईट, शिवकृष्ण धाम, संत ज्ञानेश्वर सोसायटीसह स्थानिक महिलांच्या मागणीनुसार परिवहन समितीचे सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांच्या निर्देशानार नागपूर महानगरपालिका परिवहन विभागाच्या वतीने मंगळवारी (ता. ३०) बोखारा फाटा-बर्डी बससेवेचे उद्‌घाटन महिला व बालकल्याण समितीच्या सभापती संगीता गिऱ्हे यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी परिवहन विभागाचे अधिकारी रामराव मातकर, डिम्टस्‌चे अधिकारी हेमंत कावडे, डेपो अधिकारी सागर पाध्ये उपस्थित होते.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी बर्डीहून ओमनगरपर्यंत बससेवा होती. याच सेवेचा विस्तार करण्यात आला असून आता सदर बस कोराडी रोड अंडर ब्रीज, वॉक्स कुलर फॅक्टरी, रजत हाईटपर्यंत येईल. रजत हाईट हा अंतिम थांबा असेल. परतीच्या प्रवासात ही बस रजत हाईट, बोखारा फाटा, ओमनगर, भीम चौक, कडबी चौक, एलआयसी चौक, संविधान चौक असे मार्गक्रमण करीत बर्डीला येईल.

सकाळी ७ पासून रात्री ९ पर्यंत दोन्ही बाजूने प्रत्येकी दहा फेऱ्या होतील. उद्‌घाटन कार्यक्रमाला परिसरातील रजत हाईट येथील सुनंदा कोलते, रिना कुशवाह, माधुरी झा यांच्यासह अनेक महिला तसेच दीपक गिऱ्हे, पंकजकुमार कुशवाह, राशीद खान, नीलेश नायडू, सुदेश मेश्राम, अरविंद डाखोळे, सुरेश पाटील, राजीव झा, गणेश प्रसाद, मोईज खान, नवीन गुप्ता आदी उपस्थित होते.