Published On : Sat, Jun 19th, 2021

लिबर्टी उड्डाणपुलाखालील सुशोभीकरणाचे उदघाटन

ना. गडकरींनी केले नागपूरच्या कलाकारांचे तोंडभरून कौतुक

नागपूर: लिबर्टी उड्डाणपुलाखालील सुशोभीकरणाचे उदघाटन आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. नागपूरच्या कलाकारांनी अत्यंत सुंदर आणि कल्पकतेने, खूप मेहनत घेऊन हे काम केले, या शब्दात ना गडकरी यांनी कलाकारांचे तोंडभरून कौतुक केले.

Advertisement

या कार्यक्रमाला क्रीडा मंत्री सुनील केदार, महापौर दयशंकर तिवारी, आ. कृष्णा खोपडे, आ. ना गो गाणार, आ. विकास कुंभारे, माजी आ डॉ माने, अंजुमन महाविद्यालयाचे प्राचार्य उपस्थित होते. अंजुमन महाविद्यालयात हा कार्यक्रम झाला.

याप्रसंगी ना. गडकरी म्हणाले, कोविदच्या काळात स्थिती खराब असताना त्या काळात या कलाकारांना काम मिळाले. या सुशोभीकरणात इतिहास, संस्कृती, खेळ, विज्ञान, वन्य जीवन अशा सर्वांचाच समावेश केला आहे. याशिवाय योगासन, प्राणायाम, विपश्यना आदींची माहिती देण्यात यावी.
ज्यांच्यामुळे नागपूर आणि विदर्भ ओळखला जातो अशा 25 महापुरुषांचे चित्र आणि माहिती दिली आहे. यात राजे रघुजी भोसले, बख्त बुलंद शाह, डॉ हेडगेवार, कॉ ए बी बर्धन, गोळवलकर गुरुजी, काँग्रेसचे एन के पी साळवे, कवी ग्रेस, डॉ श्रीकांत जिचकार, सुमतीताई सुकळीकर, वसंत साठे, आदींचा समावेश आहे. हा पूल अध्ययन करणारा व प्रेरणा देणारा पूल आहे. कोविडच्या काळात अनेक कलाकारांचा रोजगार गेला त्या काळातच या कलाकारांना रोजगार मिळाला, ही समाधानाची बाब आहे, असेही ना गडकरी म्हणाले.

शहराला पुढे नेण्याचे प्रयत्न आहेत. अशा कामामुळे शहराचे वैभव वाढणार असल्याचे सांगताना ना गडकरी म्हणाले- येत्या 3-4 दिवसात एलएनजीवर चालणारा ट्रक येणार आहे, इथेनॉलचा पंप सुरू होत आहे. फुटाळाचे जागतिक रंगीत कारंजे ऑगस्टपर्यंत सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. ब्रॉड गेज मेट्रो ही लवकरच सुरू होणार आहे. नागपूरचेच लोक ती चालवितील, असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमात सुशोभीकरण करणाऱ्या कलाकारांचा ना गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हस्तांकित या संस्थेच्या कलाकारांनी 4.5 किमीचे सुशोभीकरणाचे काम केले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा प्रकल्प केला आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement