Published On : Mon, Jun 29th, 2020

गावखेड्यात पारंपरिक पद्धतीने बाहुला बाहुलीच्या लग्नाला सुरुवात

मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित सामाजिक अंतर ठेवून विवाह पार पडले

रामटेक: गावखेड्यात मोठ्या प्रमाणावर उत्साहपूर्ण वातावरनात बाहुला बाहुलीचे लग्न करण्याची परंपरा आहे…. दरवर्षी गावा गावात बाहुला बाहुली चे लग्न मोठ्या उत्साहात गावकरी साजरा करतात.

Gold Rate
11 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,09,300 /-
Gold 22 KT ₹ 1,01,600 /-
Silver/Kg ₹ 1,25,200/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

लहान मुलान पासून तर वृद्धांपर्यंत सर्वांचा सहभाग असतो. यावर्षी मात्र कोरोनाच्या संकटामुळे सामूहिक बाहुला बाहुलीच्या लग्नाला ब्रेक लागले. तरीसुद्धा काही लोकांनी संपूर्ण काळजी घेऊन आणि मास्क,सॅनिटायझर,सुरक्षित सामाजिक अंतर ठेवून हे विवाह पार पाडले जात आहे.

फक्त वाजनत्री व मिरवणूक सोडलं की पारंपरिक पद्धतीने व आनंदमयी वातावरनात बाहुला बाहुली चे लग्न पार पडले.यात लहान मुलामुलींपासून तरुणांनी व वृद्धांनी सुद्धा आनंदाने सहभाग घेतला.

दुधाळा(कवडक)येथील सौ.नंदा राजू भिवगडे यांच्या घरी लहान मुलामुलींनी थाटामाटात हा विवाह सोहळा साजरा केला.

त्यात सांची महादेव भिवगडे हिचा बाहुला व कृतिका राजू भिवगडे हिच्या बाहुलीचा विवाह पार पडला. ह्यावेळी वैष्णवी भिवगडे, हिमांशू भिवगडे,आचल सलामे ,मीनाक्षी सलामे,रोहिणी भिवगडे,कमला भिवगडे,समनवी बावनकुळे तसेच गावातील लहानथोर मंडळी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement