Published On : Tue, Mar 9th, 2021

सिकई मार्शल आर्ट प्रतियोगीतेत नागपूरची कु. लिना संतोष चुटे हिला सुवर्णपदक

नागपूर : सिकई मार्शल आर्ट राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करीत कु. लिना संतोष चुटे हिने सुवर्णपदक जिंकले. जयपूर येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 17 राज्यांचे खेळाडू सहभागी झाले होते.

लीना हिने एकोणीस ( १९ ) वर्षे वरील मुलींच्या गटात वैयक्तिक प्रकारात सुवर्ण विजेतेपद पटकाविले व गटांमध्ये (ग्रुप) उपविजेतेपद पटकाविले.

लिना हीला मजहर खान व मेहबूब अन्सारी हे प्रशिक्षण देतात तसेच लिनाचे आई-वडिलांनी कौतुक केले आहे. लीना हिने नागपूर नगरीचे नाव रोशन करून लिनावर सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.