Published On : Wed, Sep 9th, 2020

नागरिकांच्या सेवेत मनपा च्या ६५ रुग्णवाहिका स्थायी समिती अध्यक्ष व मनपा आयुक्तांनी दाखविली

Advertisement

हिरवी झेंडी : प्रत्येक झोनला ४ रुग्णवाहिका

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून २५ रुग्णवाहिका बुधवारपासून नागरिकांच्या सेवेत रुजू झाल्या आहेत. महानगरपालिकेत सध्या ४० रुग्णवाहिका कार्यरत असून त्यामध्ये २५ रुग्णवाहिकांची नव्याने भर पडली आहे.

मा.महापौर श्री. संदीप जोशी आणि मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांनी कोरोनाचा वाढता उद्रेक लक्षात घेता शहरातील नागरिकांसाठी जास्तीच्या रुग्णवाहिका घेण्याचे निर्देश दिले होते. अलिकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे रुग्णवाहिकेची कमतरता जाणवत होती. बुधवारी स्थायी समिती अध्यक्ष मा.श्री.विजय (पिंटू) झलके आणि मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांनी हिरवी झंडी दाखवून ॲम्बुलन्स नागरिकांच्या सेवेत रुजू केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी, उपायुक्त श्री. निर्भय जैन, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेन्द्र बर्हीरवार, सहा. आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, परिवहन व्यवस्थापक शकील नियाजी, प्रादेशीक परिवहन कार्यालयाचे मोटर वाहन निरीक्षक (RTO) सी.एच.जमधाडे व संजय फेंडारकर, मनपा परिवहन विभागाचे रविन्द्र पागे, अरुण पिपुरडे आदी उपस्थित होते.

आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांच्या निर्देशानुसार कोरोना बाधितांसाठी प्रत्येक झोन मध्ये चार रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. कोव्हीड केअर सेंटर आणि मनपा मुख्यालयात देखील रुग्णवाहिका उपलब्ध राहतील. गरजेनुसार कोरोना बाधितांसाठी झोन कार्यालयमध्ये फोन करुन ॲम्बुलन्स मागविता येईल. पूर्वी मनपाकडे २० रुग्णवाहिका होत्या मागच्या आठवडयात त्यांची संख्या वाढवून ४० करण्यात आली आणि आता त्यामध्ये २५ ॲम्बुलन्संची भर पडणार आहे. मनपा आयुक्तांनी रुग्णवाहिकेमध्ये पोर्टेबल ऑक्सीजन सिलेंडर, वाहन चालकासाठी मास्क, हँड ग्लोज (हात मोजे), सॅनिटायझर स्ट्रो ची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. ही रुग्णवाहिका नागरिकांसाठी २४ तास (24X7) उपलब्ध राहील. ‍

स्थायी समिती अध्यक्ष मा.श्री. विजय झलके यांनी सांगितले की सद्या कोव्हीडचा प्रकोप वाढल्यामुळे रुग्णवाहिकेची कमतरता लक्षात घेता कोव्हीड रुग्णांसाठी ६५ ॲम्बुलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. ही रुग्णवाहिका नागरिकांना विना मूल्य उपलब्ध करुन दिली जाईल. यासाठी संबंधितांनी झोन कार्यालयामध्ये संपर्क साधावे

झोन स्तरावर कोरोना नियंत्रण कक्षाचे फोन नंबर

अ.क्र. झोन कार्यालयाचे नांव टेलीफोन नंबर
लक्ष्मीनगर झोन क्र.०१ 0712 – 2245053
धरमपेठ झोन क्र.०२ 0712 – 2567056
हनुमाननगर झोन क्र.०३ 0712 – 2755589
धंतोली झोन क्र.०४ 0712 – 2465599
नेहरुनगर झोन क्र.०५ 0712 – 2702126
गांधीबाग झोन क्र.०६ 0712 – 2739832
सतरंजीपूरा झोन क्र.०७ मो.नं.7030577650
लकडगंज झोन क्र.०८ 0712 – 2737599
आशीनगर झोन क्र.०९ 0712 – 2655605
१० मंगळवारी झोन क्र.१० 0712 – 2599905