नागपूर: पालकमंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या यशस्वी कार्यप्रणाली व विकासकामांवर प्रभावित होऊन भाजप चे पदाधिकारि व वैद्यकीय सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ महेश महाजन व बाल्या बोरकर यांच्या नेतृत्वात कामठी विधानसभेचे माजी आमदार देवराव रडके यांचा पुतण्या , कांग्रेस चे वरिष्ठ पदाधिकारी भगवंतराव रडके यांचा मुलगा व आजनी ग्रा प (कांग्रेस)चे उपसरपंच उमेश रडके यांनी 30 च्या वर कार्यकर्त्यासह पालकमंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुख्य उपस्थितोत भारतोय जनता पार्टी मध्ये प्रवेश घेतला यावेळी पालकमंत्री ना बावनकुळे यांनी प्रवेशार्थी उमेश रडके तसेच इतर कार्यकर्त्यांचा दुपट्टा देऊन सत्कार करण्यात आला.
भाजप मध्ये जंगी प्रवेश करणाऱ्यामध्ये उमेश रडके, नीरज रडके, चुडामन वाही, दिनेश बडगे, कवडू चिंचुलकर, नरेश जीवतोडे, पंकज भोयर, शुभम रडके, नारायण वैद्य, प्यारेलाल चौधरी, रितेश हरणे, उमेश पाल, जितेंद्र धांडे, दुर्गेश धांडे, कळमकर, भोजराज राऊत, सोनू पटले, शंकर भोयर, ब्रिजेश हरणे, आशु सोनटक्के, पुरुषोत्तम अतकरे, राजेश हरणे, युवराज मेश्राम, कृष्णा इरपाते, रोशन उईके, राहूल भोने, रामदास भोयर, सदानंद गिरडे, संजय समरीत, सुखराम कुतथे, उज्वल भोंडे यांचा समावेश होता