Published On : Fri, Jun 29th, 2018

विरोधीपक्षात केवळ माकडं, कावळे आणि कोल्हे एकत्र आले आहे – अनंत कुमार हेगडे

Advertisement

नवी दिल्ली : नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानाने नेहमीच चर्चेत राहणारे केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी परत एकदा विवादित विधान केले आहे. त्यांनी विरोधकांना कावळे, माकडं आणि कोल्हे म्हटलं आहे. विरोधकांची तुलना करताना त्यांनी मोदींना वाघ ठरवले आहे. आता पुन्हा एकदा अनंत कुमार हेगडे यांनी अशा प्रकारचे विधान करुन आपल्याच पक्षाध्यक्षांचा कित्ता गिरवला आहे.

सत्ता मिळवण्याच्या लालसेपोटी एकाबाजूला कावळे, माकडं आणि कोल्हे एकत्र आले आहेत. पण दुसऱ्याबाजूला वाघ आहे. कर्नाटकमध्ये विरोधक कसे एकत्र आले त्याचे त्यांनी उदहारण दिले. त्यांनी जनतेला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वाघाला म्हणजेच पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवडून देण्याचे आवाहनही केले. आज आपण प्लास्टिकच्या खुर्च्यांवर बसलो आहोत, याला काँग्रेस जबाबदार आहे. आम्ही ७० वर्ष राज्य केले असते तर तुम्ही आज चांदीच्या खुर्च्यांवर बसला असता असे अनंत कुमार म्हणाले.

ज्यांना आपले आई-वडील माहित नाहीत ते स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवतात. त्यांना स्वत:ची ओळख नाही. त्यांना स्वत:चे कूळ नाही पण ते विचारवंत म्हणवतात असे अनंत कुमार म्हणाले.