रामटेक : सन 2018 – 19 मध्ये झालेल्या नवोपक्रम स्पर्धेत जि. प. उच्च प्राथमिक शाळा सालई (ही) ता. रामटेक शाळेने राबविलेल्या “किलबिल स्कूल बँक व किलबिल स्कूल शॉप” या उपक्रमास जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था नागपूर च्या प्राचार्या डॉ. रत्ना गुजर व अधिव्याख्याता डॉ. बालमनी नंदाला DIECPD नागपूर यांनी भेट देऊन उपक्रमाचे निरीक्षण करून दिनांक 17 जुलै 2019 ला बक्षीस वितरण समारंभात शाळेला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
इतर शाळेने जि. प. उच्च प्राथमिक शाळेला भेट देऊन असेच नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावे अश्या सूचना DIECPD नागपूर ने दिल्या.
या नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी नानाजी रामटेके सर, गणेश बेलखुडे सर प्रमोद मुरुतकर सर तसेच विश्वनाथ कुंभलकर सर व सर्व शालेय विद्यार्थी यांनी प्रयत्न केले.
Advertisement

Advertisement

Advertisement
Advertisement