Published On : Wed, Oct 31st, 2018

अंतराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत कन्हान शहराचे नाव छोटय़ा मुलीनी उंचावले

Advertisement

अंतराष्ट्रीय स्तरीय नृत्य स्पर्धेत गीत कुरजेकर व मनस्वी कुंभलकर यांचे प्रथम स्थान

कन्हान : – भारत सांस्कृतिक उत्सव अंतर्गत १३ व्या आंतराष्ट्रीय ऑलंपियाड कला सांस्कृतिक स्पर्धा खालसा पब्लीक शाळेचा हरीनंदर स्वर्ण सुरी हॉल मालवीय नगर छत्तीसगड येथे (दि २१) ते (दि २८) ऑक्टोबर रोजी आठ दिवसाचा डॉ.राखी रॉय यांचा अध्यक्षते खाली कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.यावेळी सांस्कृतिक स्पर्धा कार्यक्रमात तीन वर्षा वयोगटापासुन तर विविध वयोगटातील मुला मुलीनी स्पर्धेत भाग घेतला.

या स्पर्धेत आसाम, गुजरात , राजस्थान ,महाराष्ट्र, छत्तीसगड आदी राज्यातील स्पर्धकांनी कला सादर केले. पण मात्र महाराष्ट्र मधील नागपूर जिल्हा अंतर्गत कन्हान शहरातील गीत कूरजेकर (वय ६) व मनस्वी कुंभलकर(वय ६) यांनी डुएट नृत्य स्पर्धेत प्रथम स्थान पटकाविले .

या दोघींना आरती बेले (बालपांडे) गुरूसमाने पूरस्काराने सन्मानीत यांचा अॅकेडमीमधून मुलीनी अंतराष्ट्रीय स्तरीय नृत्य स्पर्धेत भाग घेतला होता. तसेच ग्रुप डान्स व सोलो डान्स मध्ये सुध्दा गीत कूरजेकर,मनस्वी कुंभलकर, निकीता बेले, समीक्षा वानखेडे व रूचीता वानखेडे यांनी प्रथम स्थान पटकावला.

याप्रसंगी प्रमुख अतिथीनी लहान वयोगटातील असून सर्व स्पर्धकांना मागे टाकल्याने त्याचे कौतूक करीत पारितोषिक व प्रमाणपत्रानी सम्मानित करून पुढचा वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या.