नागपूर : उत्तर नागपूर मतदारसंघातून माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. नितीन राऊत यांच्याविरोधात भाजपने पुन्हा एकदा डॉ. मिलींद माने यांच्यावर विश्वास दाखवला आहे. डॉ. माने यांनी २०१४ मध्ये नितीन राऊत यांचा पराभव केला होता. तर २०१९ मध्ये डॉ. राऊत यांनी डॉ. मानेंना पराभूत करून वचपा काढला आहे. त्यानंतर तिसऱ्यांदा या दोघांमध्ये लढत रंगणार आहे. दोन्ही नेत्यांनी ‘नागपूर टुडे’शी संवाद साधत आपले व्हिजन मांडले.
उत्तर नागपूरचा सर्वांगीण विकास करणार – मिलिंद माने (भाजप)
उत्तर नागपूरचे विद्यमान आमदार नितीन राऊत यांच्या विरोधात जनतेच्या मनात रोष आहे. येथील जनता मूलभूत सुविधांपासून वंचित असून या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यावर माझा भर राहील असे माने म्हणाले. स्थानिक जनता विकासाच्या नावावर मला नक्कीच निवडून देणार असा विश्वासही माने यांनी व्यक्त केला. तसेच नागपूरच्या सहाही मतदारसंघातून भाजपचे उमेदवार निवडून येणार असा दावाही माने यांनी केला.
जनतेचा माझ्यावर विश्वास ‘हम जुडेंगे तो जितेंगे’ – नितिन राऊत (काँग्रेस)
राज्याच्या विधानसभा निवडणूक प्रचारात जोर देऊन भाजपने मतांच्या ध्रुवीकरणावर भर दिला. भाजप नेत्यांनी ‘बटेेंगे तो कटेंगे’ हा नारा दिला.भाजपच्या नाऱ्याला काँग्रेसचे उत्तर नागपूरचे उमेदवार नितीन राऊत यांनी ‘जुडेेंगे तो जितेंगे’ने प्रत्युत्तर दिले आहे.मला माझ्या कामावर खूप विश्वास आहे. त्यामुळे मागील निवडणुकीत उत्तर नागपूर मतरदारसंघातून मी बहुमताने निवडून आले.सत्ताधाऱ्यांनी वारंवार उत्तर नागपूर मतदारसंघाच्या विकासाचा पैसा दुसऱ्या मतदारसंघात वळवला,असा आरोप राऊत यांनी केला. केवळ सत्ताधाऱ्यांच्या आडमुठीपणामुळेच उत्तर नागपूरचा विकास खुंटला. भाजपाला उत्तर नागपूरला अविकसित ठेवायचे असल्याचा घणाघात राऊत यांनी केला. सत्ताधाऱ्यांनी वारंवार उत्तर नागपूर मतदारसंघाच्या विकासाचा पैसा दुसऱ्या