Published On : Mon, May 7th, 2018

नागपूरात रॉकेल टाकून तरुणाला पेटविले

Advertisement

crime

नागपूर: लुटमारी करणाऱ्या तिघांनी विरोध केला म्हणून एका तरुणाच्या अंगावर रॉकेल टाकून जिवंतच पेटवून दिले. कामठी मार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ शनिवारी मध्यरात्री ही थरारक घटना घडली. गंभीररीत्या भाजलेल्या तरुणाचे नाव इस्माईल अब्दुल मन्नान कुरेशी (वय २४) आहे. तो यशोधरानगरातील एनआयटी क्वॉर्टरजवळ राहतो. सध्या तो मेयोत मृत्यूशी झुंज देत आहे.

कळमना गावाजवळच्या जुना कामठी रोडवर रिलायन्स पेट्रोल पंप आहे. तेथून शुक्रवारी मध्यरात्री इस्माईल रस्त्याने पायी जात होता. त्याला एका आरोपीने रोखले. ‘तुम्हारे पास कितने पैसे है, असे त्याने विचारले. इस्माईलने मेरे पास पैसे नही’, असे म्हटले असता आरोपीने त्याच्या खिशात जबरदस्तीने हात घातला. तो रक्कम काढण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे इस्माईलने त्याचा प्रतिकार केला.

Gold Rate
17 June 2025
Gold 24 KT 99,000 /-
Gold 22 KT 92,100 /-
Silver/Kg 1,07,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यामुळे या दोघांत हाणामारी झाली. ते पाहून आरोपींचे दोन साथीदार अंधारातून आले. त्यांनी इस्माईलच्या अंगावर रॉकेल ओतून माचिसची जळती काडी फेकली. त्यामुळे इस्माईलच्या अंगावरील कपड्याने पेट घेतला. त्याची छाती, दोन्ही हात पाय, मांड्या, पोट आणि पाठ गंभीररीत्या जळाली. आरडाओरड ऐकून बाजूची मंडळी धावली. त्यांनी इस्माईलला विझवून पोलिसांना कळवले. गंभीर जखमी झालेल्या इस्माईलला मेयोत दाखल करण्यात आले. त्याने दिलेल्या बयानावरून कळमना पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement