Published On : Sat, Jul 4th, 2020

विडिओ पहा  : नागपुरात दारूविक्रेत्याला महिलांनी धू-धू धुतले, पोलिसांचे अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष

नागपूर – पोलीस अवैध दारूवाल्यांवर कारवाई करत नाही म्हणून महिलांना जेव्हा कायदा हातात घेत दारू विक्रेत्याला पकडावे लागते…

नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील आग्रा गावात महिलांनी अवैध दारू विकणाऱ्याला पकडून चांगलाच चोप दिला..

आग्रा गावातील वेशिवर काल संध्याकाळी या अवैध दारू विक्रेत्याला महिलांनी पकडले आणि त्याच्याकडील प्लास्टिकच्या डबकीची पाहणी केली असता त्यात देशी दारू आढळली..

त्यानंतर महिलांनी या दारू विक्रेत्याला चांगलीच अद्दल घडवत चपलेने त्याला चांगलेच बदडले…

विशेष म्हणजे आग्रा गावात महिलांनी 29 जून रोजी बैठक घेत अवैध दारू विक्री होऊ देणार नाही असा निर्धार केला होता..

त्याची सूचना पोलिसांना ही दिली होती.. मात्र, तरीही अवैध दारूवर लगाम लागले नव्हते..

त्यामुळे, पोलीस काहीच करत नाही हे लक्षात आल्यावर महिलांनी स्वतः गावाच्या वेशीवर निगराणी ठेवणे सुरू केले आणि काल संध्याकाळी ललित खडसे ला रंगेहात पकडत दारू जप्त केली.. आणि त्याला चांगलेच बदडत पोलिसांच्या स्वाधीन केले..

विशेष म्हणजे ज्या आग्रा गावात ही घटना घडली ते आग्रा गाव गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मतदार संघातील आहे…