नागपूर : कन्हानजवळील एका खेड्यात राहणाऱ्या २० वर्षीय तरुणीचे घरच्यांनी थाटामाटात लग्न करून दिले. मात्र लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवरी चार महिन्याची गर्भवती असल्याची बाब उघड झाल्याने सर्वानाच मोठा धक्का बसला.
माहितीनुसार, पीडित २० वर्षीय तरुणी ही कन्हानजवळील एका खेड्यात राहते. तिचे आईवडिल शेतमजूर आहेत. नातेवाईक असलेला युवकाचे तिच्यासाठी स्थळ आले. आईवडिलांनी मोठ्या थाटामाटात तिचे लग्न लावून दिले. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नवरीला घ्यायला वराकडील मंडळी आली. पाहुणचार ओटापून मुलगी सासरी रवाना झाली. सासरी आल्याआल्याच तिसऱ्या दिवशी नवख्या सुनेला उलट्या होत होत्या.
उन्हामुळे प्रकृती खराब झाल्याचे समजून पतीने तिला डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर पती-पत्नीचे अभिनंदन केले आणि पत्नी गर्भवती असल्याचे सांगितले. त्यामुळे पतीला मोठा धक्काच बसला. पत्नीसह घर गाठले. त्यानंतर तिच्या कुटुंबियांना याबाबत माहिती दिली. सासरी असलेल्या मुलीला घेऊन वडिलांनी घर गाठले.
कुुटुंबियांनी तिला आस्थेने विचारपूस केल्यानंतर तिने सर्व हकिकत कुटुंबियांना सांगितली.घराशेजारी राहणारा आरोपी अजय खन्ना याने मुलीला जाळ्यात ओढून वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातूनच ती गर्भवती राहिल्याची बाबा उघड झाली. या प्रकरणी पोलिसांनी अजय खन्ना याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.