Published On : Tue, Nov 24th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात चारित्र्याच्या संशयातून पतीचा पत्नीवर हातोड्याने हल्ला; पूजा गंभीर जखमी, आरोपी पतीला अटक

Advertisement

नागपुरात चारित्र्याच्या संशयातून पतीचा पत्नीवर हातोड्याने हल्ला; पूजा गंभीर जखमी, आरोपी पतीला अटक

नागपूर : पती-पत्नीच्या नात्यातील संशयाचे रूपांतर हिंसक वादात झाल्याची धक्कादायक घटना नागपुरात समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत संतापलेल्या पतीने तिच्या डोक्यावर हातोड्याने जोरदार वार केल्याची घटना घडली. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. पूजा नीरज आमडे असे जखमी महिलेचे नाव असून पोलिसांनी आरोपी पती नीरज कैलास आमडे याला अटक केली आहे.

नागपूरच्या यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिनाकी मंगलवारी परिसरात २३ नोव्हेंबर रोजी दुपारी ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, नीरज आमडे हा पत्नी पूजाच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याचे सांगितले जाते. याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे.

२३ नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे एक वाजताच्या सुमारास घरात पती-पत्नीमध्ये पुन्हा वाद झाला. या वादादरम्यान संतापलेल्या नीरजने हातोडा उचलून पत्नी पूजाच्या डोक्यावर वार केला. या हल्ल्यात पूजा गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाली. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

जखमी पूजाला तातडीने मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच यशोधरानगर पोलिसांनी तपास सुरू करून आरोपी पती नीरज आमडे याला अटक केली. या प्रकरणी यशोधरानगर पोलीस ठाण्याचे एपीआय संदीप काळे यांनी घटनेबाबत माहिती दिली.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.