Published On : Thu, Jun 11th, 2020

शेतमजुराची कमतरता भासल्यास पेरणी यंत्राने पेरणीचे मार्गदर्शन

Advertisement

कन्हान : – लॉकडाऊन काळाने सध्या च्या परिस्थितीत मजुरांची उपलब्धता होईल की नाही ? या चिंतेत शेतकरी असल्याने पारशिवनी तालुका कृषी विभागा व्दारे शेतीकाम सहाय्यक यंत्राने करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्या करिता देशात व राज्यात टाळेबंदी व संचारबंदी मुळे दुस-या राज्यातील मजुर वर्ग आपल्या गावी परत गेले. आपल्या कडे केल्या जाणाऱ्या धान शेतीत लागव डीसाठी मोठ्या प्रमाणात भंडारा व मध्य प्रदेशातील मजुर वर्ग येतो. पण संध्या स्थितीत ते येतील की नाही.

याची खात्री नसल्याने शेतकरी चिंतेत असल्याचे पाहु न पारशिवनी तालुका कृषी अधिकारी जी बी वाघ व कृषी सहाय्यक ठोंबरे हया नी साटक येथील शेतकऱ्यांनी पेरणी यं त्राने पेरणी करिता विनाअनुदानित पेरणी यंत्र घेऊन ठेवले असल्याने या यंत्राने पेर णी कशी करायची याचे प्रात्यक्षिक करू न शेतक-याने मजुराची कमतरता भास ल्यास शेतीकाम सहाय्यक यंत्राने पेरणी, मळणी व इतर कामे करण्याबाबत मार्ग दर्शन करण्यात आले.

तसेच साटक गा वात कृषी अधिकारी जी बी वाघ व कृषी सहाय्यक ठोंबरे हयानी पेरणी यंत्रा बाब त माहिती सांगितली. याप्रसंगी शेतकरी बबन पंचम मेहरकुळे, आकाश मेहरकु ळे, मनिराम वाडीभस्मे, सचिन वाडीभस्मे, आकाश हिंगणकर आणि गावकरी उपस्थित होते.