Published On : Tue, Oct 6th, 2020

भंडारा जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70.38 टक्के

Advertisement

आज 90 रूग्णांना डिस्चार्ज
163 कोरोना पॉझिटिव्ह
बरे झालेले रुग्ण 4399
पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 6250
क्रियाशील रुग्ण 1705
आज 07 मृत्यू
एकूण मृत्यू 146

भंडारा : जिल्ह्यात आज 90 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4399 झाली असून आज 163 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 6250 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70.38 टक्के आहे.

Advertisement
Advertisement

आज 830 व्यक्तींचा घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीत आले असून त्यापैकी 163 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 49 हजार 786 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 6250 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 84, साकोली 19, लाखांदूर 15, तुमसर 08, मोहाडी 14, पवनी 19 व लाखनी तालुक्यातील 04 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 4399 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 6250 झाली असून 1705 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 07 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 146 झाली आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या- भंडारा- 3207, साकोली – 492, लाखांदुर- 283, तुमसर- 537, मोहाडी- 578, पवनी- 590 व3 लाखनी- 56 असे एकूण 6250 पॉझिटिव्ह रुग्ण आतापर्यंत जिल्ह्यात आढळून आले. यापैकी 4399 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70.38 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 02.33 टक्के एवढा आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement