नागपूर ग्रामीणच्या 28 गावांमध्ये पालकमंत्री बावनकुळेंचा प्रचाराचा झंझावात

मतदारांचा प्रचंड प्रतिसाद

नागपूर: कामठी विधानसभा मतदारसंघात असलेल्या नागपूर ग्रामीणच्या 28 गावांमध्ये पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मतदारांशी थेट संपर्क करून प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. या प्रचारात त्यांच्यासोबत भाजपाचे कार्यकर्ते आणि मतदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Advertisement

पालकमंत्री बावनकुळे यांनी आज सायंकाळी कळमना येथून मतदारांच्या भेटीची सुरुवात केली. त्यांनीतर उमरगाव, विहीरगाव, अड्याळी, हुडकेश्वर, किरणापूर, कन्हाळगाव, धामणा, चिकणा, सालई गोधनी, काळडोंगरी, बनवाडी पेवठा, रुई, खरसोली-पिल्कापार, वेळाहरी, गोटाळपांजरी, शंकरपूर, पांजरी बु., गवसी, धुटी खसरमारी, पांजरी लोधी, नवरमारी, सुकळी, मांगरुळ, तुमडी, डोंगरगाव, जामठा, परसोडी, खापरी गावठाण, खापरी पुनर्वसन या गावांमध्ये जाऊन मतदारांशी थेट संपर्क केला.

या संपर्कादरम्यान नागरिकांना शासनाने केलेल्या कामांची माहिती देऊन भविष्यात राबविण्यात येणार्‍या प्रकल्पांची माहिती दिली. अपूर्ण असलेल्या योजना भाजपा शासनच पूर्ण करणार असून येत्या 24 तारखेला भाजपा शिवसेना महायुतीचे 220 आमदार निवडून येऊन पुन्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होत आहेत. या मतदारसंघासाठी पुन्हा कोट्यवधीचा विकास निधी उपलब्ध होणार आहे.

आपण चुकीचे बटन दाबले तर मतदारसंघाचा आणि आपल्या गावाच्या विकासाला खीळ बसेल, असेही पालकमंत्री मतदारांशी संपर्क करताना म्हणाले. यावेळी पालकमंत्र्यांसोबत रुपराव शिंगणे, शुभांगी गायधने व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement