Published On : Tue, Jun 2nd, 2026
By Nagpur Today Nagpur News

राज्य मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय:रस्ते विकासासाठी १७,४०० कोटींचे अर्थसहाय्य, मुंबईतील समूह विद्यापीठाचा विस्तार

Advertisement

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पायाभूत सुविधा आणि उच्च शिक्षण क्षेत्राशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यातील रस्ते विकासाला गती देण्यासाठी मोठ्या आर्थिक सहाय्याला मंजुरी देण्यात आली असून मुंबईतील हैद्राबाद (सिंध) नॅशनल कॉलेजिएट विद्यापीठाच्या विस्तारालाही हिरवा कंदील देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-३ अंतर्गत विविध कामांसाठी आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेकडून (AIIB) ५०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स कर्ज घेण्यास तसेच राज्याच्या निधीच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली. यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे अधिक सक्षम करण्यास मदत होणार आहे.

Gold Rate
June 17 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 50,600 /-
Gold 22 KT ₹ 1,39,800 /-
Silver/Kg ₹ 2,48,300/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्पासाठी आशियाई पायाभूत गुंतवणूक बँक (AIIB) आणि न्यू डेव्हलपमेंट बँक (NDB) या दोन्ही वित्तीय संस्थांकडून प्रत्येकी ८ हजार ७०० कोटी रुपये, असे एकूण १७ हजार ४०० कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे. या निधीमुळे राज्यातील प्रमुख रस्त्यांचे आधुनिकीकरण, सुधारणा आणि विकास प्रकल्पांना वेग मिळणार असून वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्याची अपेक्षा आहे.

उच्च शिक्षण क्षेत्रातही महत्त्वाचा निर्णय घेत मंत्रिमंडळाने हैद्राबाद (सिंध) नॅशनल कॉलेजिएट विद्यापीठ, मुंबई या समूह विद्यापीठामध्ये सहा महाविद्यालयांचा समावेश करण्यास मंजुरी दिली. यामध्ये प्राचार्य के. एम. कुंदनानी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, किशनचंद चेलाराम विधि महाविद्यालय, श्रीमती मिठीबाई मोतीराम कुंदनानी वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, ऋषी दयाराम आणि सेठ हसराम नॅशनल तसेच सेठ वासियामुल्ल असोमुल्ल विज्ञान महाविद्यालय आणि थडोमल शाहनी अभियांत्रिकी महाविद्यालय यांचा घटक महाविद्यालये म्हणून समावेश करण्यात येणार आहे.

Advertisement

या निर्णयामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि संशोधन क्षमतेत वाढ होण्यास मदत होणार असून विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार आणि एकात्मिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Advertisement
भांडेवाडी में 60 वर्षीय बुजुर्ग ने 4 साल की मासूम के साथ किया जघन्य कृत्य.. #nagpurnews #crime #news

भांडेवाडी में 60 वर्षीय बुजुर्ग ने 4 साल की मासूम के साथ...

NAGPUR TODAY  | TOP - 10 NEWS | 17 JUNE 2026 #news #newsupdate #top #maharashtranews #maharashtra

NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | 17 JUNE 2026 #news...

बीएसएनएल केबल चोरी रैकेट का पर्दाफाश.. #nagpurnews #crime #latestnews #newsupdate

बीएसएनएल केबल चोरी रैकेट का पर्दाफाश.. #nagpurnews #crime #latestnews #newsupdate

आरटीआई में चौंकाने वाला खुलासा सामने आया.. #maharashtranews #latestnews #newsupdate

आरटीआई में चौंकाने वाला खुलासा सामने आया.. #maharashtranews #latestnews #newsupdate

42 डिग्री तापमान से जनजीवन प्रभावित ...#news #newsupdate #latestnews #vidarbha #maharashtranews

42 डिग्री तापमान से जनजीवन प्रभावित ...#news #newsupdate #latestnews #vidarbha #maharashtranews

MD ड्रग्स पर पुलिस का बड़ा एक्शन बाप-बेटा गिरफ्तार..#nagpurnews #crime #mddrugs #latestnews

MD ड्रग्स पर पुलिस का बड़ा एक्शन बाप-बेटा गिरफ्तार..#nagpurnews #crime #mddrugs #latestnews

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges