Published On : Tue, Apr 7th, 2020

जागतिक आरोग्याचे आणि आरोग्य संघटनेचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित-अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून जागतिक आरोग्यदिनानिमित्त शुभेच्छा…

मुंबई : संपूर्ण जग कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करत असताना जागतिक आरोग्याचे आणि आरोग्य संघटनेचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजच्या जागतिक आरोग्यदिनाच्या निमित्ताने राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

‘आरोग्यम् धनसंपदा’, आरोग्यासारखं धन नाही असं मानणारी आपली संस्कृती आहे, परंतु जागतिकीकरणाच्या काळात, आधुनिक जीवनपद्धतीत वैयक्तिक आरोग्याच्या बरोबरीने, सार्वजनिक, जागतिक आरोग्यही तितकेच महत्वाचे आहे हे ‘कोरोना’संकटाच्या निमित्ताने आपल्या पुन्हा एकदा लक्षात आले आहे. यापासून धडा घेऊन भविष्यात वैयक्तिक आरोग्याच्या बरोबरीने सार्वजनिक आरोग्याच्या रक्षणसाठी आपण सर्वजण कटीबद्ध होऊया असेही शेवटी संदेशात अजित पवार म्हणाले आहेत.