नागपूर: मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एकात्मिक रस्ते विकास योजनेंतर्गत रस्ता रुंदीकरणा नंतर मधोमध येणारे वीज खांब आणि वीज वहिन्या भूमिगत करण्यासाठी करण्यासाठी बुधवार दिनांक १० जून २०२० रोजी शहरातील सिरसपेठ, गंजीपेठ, भालदारपुरा येथील वीज पुरवठा बंद राहणार आहे. सकाळी ७ ते ११ या वेळेत संत्रा मार्केट, मच्छी मार्केट, दोसार भवन, भोईपुरा ,गंजीपेठ, लोधीपुरा,लोहारपूरा ,सिरसपेठ, भोसले विहार, नाईक रोड, उपाध्ये रोड,गुजरवाडी, सकाळी ८ ते ११ या वेळात हिवरी नगर जुनी मंगळवारी, गरोबा मैदान चौक, आझम शहा चौक, सकाळी ७ ते १० या वेळेत हसनबाग, नंदनवन, ओम नगर, भांडे प्लॉट येथील वीज पुरवठा बंद राहील.
Published On :
Tue, Jun 9th, 2020
By Nagpur Today
आज सिरसपेठ,गंजीपेठ येथील वीज पुरवठा बंद
Advertisement