Published On : Wed, May 12th, 2021

महागड्या कोरोना उपचारासाठी पंतप्रधानांची आयुष्यमान भारत योजना लागु करून किमान ५ लाखांची वैद्यकीय सवलत द्या

Advertisement

– राष्ट्रवादीचे काॅंग्रेसचे ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष ईश्र्वर बाळबुधे यांनी केली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेकडे मागणी

नागपुर – आज महाराष्ट्रात व नागपुरात प्रचंड संखेने गंभीर अवस्थेतील कोविड रूग्ण विविध शासकीय व बहुसंखेने खाजगी रूग्णालयात दाखल होत आहे. मध्यमवर्गीय व गरीब कोरोनाग्रस्तांना व त्यांच्या कुटुंबियांना या खर्चिक व गंभीर रूग्णांचा खर्च भागविणे अतिशय कठीण होत आहे. जवळच्या माणसांचा जीव वाचावा ह्या आकांतान, सारे घरदार विकुन, सोने न्हाने विकत, शेतीवाडी लहान ठेऊन होत्याचे नव्हते करून प्रपंचाची घडी मोडुन कसे तरी कोरोना रूग्णासाठी खर्च करीत आहे. ज्यांच्याकडे काही सोय नाही अशा गरिब नागरिकांनी पैशाअभावी घरीच शेवटचा श्वास सोडला.

महाराष्ट्र शासनाची महात्मा फुले जनआरोग्य योजना आहे पण कोरोनावरचा चार लाख ते सात लाखावरचा रूग्णालयाचा खर्च पाहता ही योजना सुध्दा सवलतीसाठी अपुरी कमी पडते व रूग्णांच्या नातेवाईकांना पुर्णपणे वैद्यकीय सवलत देण्यास असमर्थ ठरत आहे.

केंद्र सरकारची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरीकांसाठी फार मोठा गाजावाजा करून, देशातल्या सामान्य माणसाच्या अडचणीच्या व गंभीर आजाराच्या काळात उपयोगी पडावी,म्हणुन ‘आयुष्यमान भारत योजना’ देशवासियांसाठी लागु करून समर्पित केलेली आहे. आज या कोरोनाच्या महामारीच्या काळात, सामान्य मध्यमवर्गीयांना दिलासा देण्यासाठी, हीच केंद्र सरकारची आयुष्यमान भारत योजना सर्व खाजगी कोरोना उपचार करणार्‍या खाजगी हाॅस्पीटल यांना लागु करण्याची नितांत गरज आहे. त्या योजनेमध्ये पाच लाख रूपयापर्यंतचा उपचार करण्याची व त्या खाजगी हाॅस्पीटलचा कोरोना रूग्नावरील औषधीसह सर्व खर्च त्या हाॅस्पीटलला मिळेल अशी व्यवस्था केंद्र सरकारने गरजेचे आहे.

ही आयुष्यमान भारत योजना व त्याचे रजिस्ट्रेशन करण्याची तरतुद ही कोरोनाच्या प्रत्येक खाजगी हाॅस्पीटलमध्ये करण्याची तरतुद करण्यात यावी. या साठी नागरीकांचे केसरी व पिवळे रेशन कार्ड आणि आधार कार्ड ग्राह्य धरून त्याची ही पाच लाखापर्यंत सवलत मिळण्यासाठी, हाॅस्पीटलमध्येच नोंदणी करावी. अशा प्रकारे नोंदणी केलेल्या रूग्णांसाठी नातेवाईकांकडुन कुठलीही अग्रीम रक्कम घेवु नये असे निर्देश सर्व खाजगी कोविड हाॅस्पीटलला देण्यात यावे ,अशी मागणी ,राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ओबीसी सेल चे प्रदेशाध्यक्ष ईश्र्वर बाळबुधे यांनी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून केलेली आहे.

त्याच प्रमाणे नागपुरचे खासदार व केंद्रिय मंत्री मा. ना. नितिन गडकरी यांनी सुध्दा या बाबत पंतप्रधान यांचेकडुन ही कोरोना ग्रस्तांसाठी आयुष्यमान भारत योजना अशा प्रकारे मंजुर करवून घ्यावी अशी त्यांनाही पत्राव्दारे विनंती केलेली आहे.